महाराष्ट्रलोकल न्यूजसाहित्य-कला-संस्कृती
रत्नागिरीत ईद ए मिलाद उत्साहात साजरी
रत्नागिरी : इस्लाम धर्माचे प्रेषित हजरत मोहम्मद पैगंबर यांचा जन्मदिवस ईद ए मिलाद म्हणून साजरा केला जातो. ईद ए मिलाद चे औचित्य साधून दावते इस्लामी रत्नागिरी शाखेतर्फे जुलूस रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.
ही जुलूस रॅली अतिशय शिस्तबद्ध पद्धतीपणे काढण्यात आली,या वेळी दुचाकी,चारचाकी वाहने, सहभागी झाली होते. जुलूस उद्यमनगर, कोकण नगर मारुती मंदिर ते उद्यमनगर मार्गे कोकण नगर येथे शेवट करण्यात आला.
तसेच जुलूसमध्ये दावते इस्लामी शाखा रत्नागिरीचे सदस्य, उवेज जरीवाला, अली असगर अत्तारी तसेच इतर सर्व सदस्य उपस्थित होते. नंतर सर्वांना नियाजचे वाटप करण्यात आले. रॅली सुरळीत पार पाडण्यासाठी रत्नागिरी शहर पोलिसांनी विशेष मेहनत घेतली.