महाराष्ट्ररत्नागिरी अपडेट्सराजकीयलोकल न्यूज
आम आदमी पक्षाचे जिल्हाध्यक्ष परेश प्रताप साळवी यांचा शिवसेनेत प्रवेश
रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्याचे आम आदमी पक्षाचे जिल्हाध्यक्ष परेश प्रताप साळवी यांनी ‘आप’ला राजीनामा दिल्यानंतर राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. मंत्री उदय सामंत यांनी रत्नागिरी जिल्ह्यात केलेल्या विकासकामांनी प्रभावित होऊन ते शिवसेनेत प्रवेश करत आहेत.
परेश साळवी यांच्या शिवसेनेत प्रवेशामुळे रत्नागिरी जिल्ह्यातील शिवसेनेची ताकत वाढली आहे. शिवसेनेच्या जनसेवेच्या कार्यामुळे आणि पक्षाच्या विकासाच्या दृष्टीने ते शिवसेनेत प्रवेश करत आहेत, असे ते म्हणाले. यावेळी मंत्री उदय सामंत यांनी परेश साळवी यांचे स्वागत केले. या पक्षप्रवेशामुळे रत्नागिरी जिल्ह्यात ताकत वाढली आहे.