महाराष्ट्ररत्नागिरी अपडेट्सलोकल न्यूजशिक्षण

कुणबी सेवा संघ दापोली आणि मे. अश्विनी ॲग्रो फार्मकडून मोफत फळझाडांचे वाटप

संगमेश्वर : देशाच्या स्वातंत्र्यपूर्व काळापासून कुणबी सेवा संघ ही समाजोपयोगी अनेक उपक्रम राबवत आहे. या मध्ये मुला-मुलींसाठी वस्तीगृह, वसतीगृहातील विद्यार्थी -विद्यार्थिनींसाठी विनामूल्य संगणक शिक्षण देणारे व्यवसाय शिक्षण विद्यालय, लोकनेते शामराव जी पेजेस कृषिविकास प्रकल्प, बाळासाहेब खेर कृषी उद्योग व प्रशिक्षण केंद्र,समाजात विविध क्षेत्रामध्ये आपल्या कार्याचा ठसा उमटविणाऱ्यांचा उचित सन्मान व्हावा म्हणून देण्यात येणारा सेवाव्रती पांडुरंग शिंदे गुरुजी पुरस्कार,सभा,लग्न समारंभ इत्यादींसाठी उपलब्ध असणारे ६०० आसनक्षमता असणारे एक आणि १७५ आसनक्षमता असणारे दुसरे सभागृह, शेतकऱ्यांना माफक दरात दर्जेदार फळझाडे कलम/रोपे उपलब्ध करून देणारी सरकारमान्य रोपवाटिका “कृषी केंद्र नवभारत छात्रालय” या विविध उपक्रमांबरोबरच संस्था अनेक अन्य उपक्रम राबविते.

संस्थेचे अध्यक्ष प्रभाकर शिंदे सर यांच्या कुटुंबीयांच्या मालकीची असणारी मे. अश्विनी ॲग्रोफार्म ही रोपवाटिका २५ वर्षांहूनही अधिक काळापासून सेवाभावी दृष्टीकोन डोळ्यासमोर ठेवून शेतकऱ्यांना फळझाडे आणि इतर झाडांची कलमे/रोपे उपलब्ध करून देण्याचे कार्य करत आहे.शेतकऱ्यानी फळझाडे व इतर उपयोगी झाडे लागवडीस प्रवृत्त व्हावे आणि त्यांना आर्थिक पाठबळ मिळावे म्हणून या दोन्ही संस्थांमार्फत गेली अनेक वर्षांपासून प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या गावात जाऊन मोफत कलमे/रोपे वाटप केली जातात.

या उपक्रमात संस्थेचे अध्यक्ष श्री प्रभाकर शिंदे सर, सरचिटणीस हरिश्चंद्र कोकमकर ,उपाध्यक्ष डॉ.प्रमोद सावंत सर,मे. अश्विनी ॲग्रोफार्म घ्या संचालिका सौ.सुषमा प्रभाकर शिंदे मॅडम या सर्वांचा मोठा वाटा असतो.या कामी संस्थेचे इतर पदाधिकारी राजेंद्र शिंदे, लहू केसरकर, चंद्रकांत मोहिते, बाळकृष्ण भुवड इत्यादींचे सहकार्य मिळते.या कार्यक्रम आयोजनासाठी कृषी महाविद्यालय दापोली चे विस्तार शिक्षण विभाग, सामाजिक संस्था आदींचे ही बहुमोल सहकार्य लाभते.

सन २०२३-२४ या चालू आर्थिक वर्षा मध्ये वरील दोन संस्थांमार्फत मोफत वाटप करण्यात आलेल्या कलमे/रोपे यांचा तपशील पुढीलप्रमाणे – मुक्काम सातांबा,भडवळे, माथेगुजर,विरसई, लाडघर,करजगाव,कोळथरे, या दापोली तालुक्यातील,शेरवली तालुका खेड, कोलघे,वरवेली, तालुका लांजा आणि पालघर वाडी,बोरकर तालुका मंडणगड या गावांमध्ये एकूण १४३६ शेतकऱ्यांना संस्थेमार्फत ५७४४कोकम,८८जांबुळ रोपे आणि मे. अश्विनी ॲग्रोफार्म यांचे मार्फत २८७२ काळीमिरी आणि ३४०चिकू कलमांचे वाटप झाले.

या संयुक्तपणे घेतलेल्या कार्यक्रमांशिवाय प्रभाकर शिंदे सर यांच्या पुढाकाराने मे.अश्विनी ॲग्रोफार्म यांचे मार्फत दापोली तालुक्यातील आणखी दोन गावांमध्ये रोपे वाटपाचा कार्यक्रम घेण्यात आला. कोळबांद्रे या गावी १०० शेतकऱ्याना ४०० कोकम २०० काळीमिरी रोपांचे तर करंजाळी या गावांमध्ये रस्त्याच्या कडेने लावण्यासाठी २०० जांभूळ,१० भेंडी, ५४आवळा, ३६ वड इ. रोपांचे मोफत वाटप करण्यात आले.काही रोपांचे प्रातिनिधिक स्वरूपात वृक्षारोपणही करण्यात आले.

Team RatnagiriLive

कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button