‘कृषी उमेद’तर्फे आबिटगाव येथे अळंबी उत्पादनाचे प्रात्यक्षिक
![](https://ratnagirilive.in/wp-content/uploads/2024/08/IMG-20240806-WA0030-780x470.jpg)
चिपळूण : गोविंदरावजी निकम कृषी महाविद्यालय मांडकी पालवण अंतर्गत ग्रामीण कृषी कार्यानुभव 2024- 25 च्या `कृषी उमेद’ संघाच्या कृषी कन्यांद्वारे आबिटगाव येथे आळंबी उत्पादनाचे प्रात्यक्षिक घेण्यात आले. या उपक्रमांतर्गत साजोर काजू या जातीच्या अळंबीचे प्रात्यक्षिक घेऊन यशस्वीरित्या आळंबी उत्पादन पार पडले.
हे प्रात्यक्षिक गोविंदरावजी निकम कृषी महाविद्यालयाचे प्राध्यापक श्री. बाळासाहेब सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आले. यावेळी गावातील काही शेतकरी उपस्थित होते. कमीत कमी जागेत जास्तीत जास्त उत्पादन कसे घेता येईल याचे मार्गदर्शन शेतकऱ्यांना केले.
प्रात्यक्षिक घेण्यासाठी कृषी उमेद संघाच्या कृषी कन्या कु. साक्षी थोरात, अनुजा माने, वेदिका शिगवण, प्रियता मांजरेकर, साक्षी मोहिते, स्नेहल गरुड, क्रिस्टीना ,सानिका बिरांजे ,वैष्णवी शिर्के, रितिका कांबळे, मानसी वाघाटे यांच्या प्रयत्नांनी अळंबीचे प्रात्यक्षिक यशस्वीरित्या पार पडले.