कोकण रेल्वे मार्गावर ख्रिसमससाठी आणखी चार विशेष गाड्या धावणार!
रत्नागिरी/मुंबई : हिवाळी पर्यटन हंगाम तसेच क्रिसमस साठी गोव्याकडे येणाऱ्या रेल्वे प्रवाशांची संख्या लक्षात घेऊन कोकण रेल्वे मार्गावर आणखी चार विशेष गाड्या चालविल्या जाणार आहेत.
0 1453/01454 लोकमान्य टिळक टर्मिनस ते मंगळूरु मार्गावर दिनांक 22 डिसेंबर ते 29 डिसेंबर 2023 या कालावधीत विशेष गाड्या धरणार आहेत.
014 55 /01456 या गाड्यांची जोडी मुंबईतील लोकमान्य टिळक टर्मिनस ते गोव्यातील कर्म ही दरम्यान 24 डिसेंबर 2023 पासून धावणार आहे.
क्रिसमस साठी ची तिसरी विशेष गाडी 01155/01156 लोकमान्य टिळक टर्मिनस ते मंगळूरू दरम्यान 26 डिसेंबर 2023 पासून चालवली जाणार आहे.
हिवाळी पर्यटन हंगाम तसेच क्रिसमस च्या सुट्टीमुळे कोकण रेल्वे मार्गावरील गर्दी नियंत्रणात आणण्यासाठी चौथी विशेष गाडी (01459/01460) हे लोकमान्य टिळक टर्मिनस ते गोव्यातील करमाळी दरम्यान 21 डिसेंबर पासून 28 डिसेंबर 2023 पर्यंत आठवड्यातून एकदा चालवली जाणार आहे.
- हे देखील वाचा : Konkan Railway | ‘दिवा-सावंतवाडीला’जोडलेले एसी डबे पुढील सूचनेपर्यंत कायम
- गोदाम व्यवस्थापनात रत्नागिरीला ‘फाईव्ह स्टार’ नामांकन : कैलास वाघ
- दिवाळीतील किल्ले पाहण्यासाठी दापोलीत सायकल फेरी