महाराष्ट्ररत्नागिरी अपडेट्सलोकल न्यूज
गणेशचतुर्थी निमित्त पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते ‘आनंदाचा शिधा’ वाटप
रत्नागिरी, दि.१७ : गणेश चतुर्थीच्या निमित्ताने पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते आज ‘आनंदाचा शिधा’ चे वाटप लाभार्थ्यांना करण्यात आले.
पाली येथील बाजारपेठ येथे झालेल्या या कार्यक्रमात जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह, पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी, मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्ती किरण पुजर आणि जिल्हा पुरवठा अधिकारी रोहिणी रजपूत यांनीही आनंदाचा शिधा चे वाटप लाभार्थ्यांना केले.
२ लाख ६१ हजार ७७१ कीट प्राप्त झाले असून, तालुकानिहाय दुकानदारांच्या मागणीनुसार जेवढे कीट मागणी केली, तेवढे कीट प्राप्त झालेले आहेत. याचे वाटप जिल्ह्यात सर्वत्र सुरु आहे.
यावेळी अपर जिल्हाधिकारी शंकर बर्गे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी आधिकारी परीक्षित यादव, प्रांताधिकारी जीवन देसाई आदींसह लाभार्थी उपस्थितीत होते.