महाराष्ट्ररत्नागिरी अपडेट्सराजकीयलोकल न्यूज

गुन्हेगारांना सोबत घेऊन नागरिकांची चर्चसत्रे उधळायचा अधिकार कोणी दिला : नीलेश राणे

शिस्तीत रहा ; चर्चासत्र तर होणारच आणि विषयांवर बोललं जाणारच; दिला इशारा*

रत्नागिरी : गुन्हेगारांना सोबत घेऊन चर्चासत्र उधळायच, लोकांना बोलूच द्यायचं नाही हा अधिकार तुम्हाला कोणी दिला आहे, लोकांना दडपशहीने गप्प करण्याची ही पद्धत चालणार नाही, व्यवस्थेवर चर्चा तर होणारच आणि अशा चर्चासत्रात मी सुध्दा उपस्थित राहणार त्यामुळे शिस्तीत रहा असा इशारा भाजपा नेते माजी खासदार नीलेश राणे यांनी दिला आहे,

रस्त्याच्या बिकट अवस्थेसह अनेक प्राथमिक प्रश्नांमुळे त्रस्त झालेले रत्नागिरीतील सामान्य नागरिक रविवारी शहरातील एका हॉटेलमध्ये एकत्र येणार होते. यामधे जी पालिका व्यवस्था आहे तिथपर्यंत हा जनतेचा आवाज कसा पोहोचवायचा यावर चर्चा होणार होती. मात्र ही सभा होण्यापूर्वीच ती उधळण्यात आली. मुद्दे मंडणाऱ्याना बोलूच न देता त्यांना धमकवण्यात आले, धक्काबुक्की करण्यात आली, या पार्श्वभूमीवर भाजपा नेते निलेश राणे आक्रमक झाले आहेत. या सभेत जो प्रकार झाला तो सर्वसामान्यांचा आवाज दाबण्याचा प्रकार असून रत्नागिरीला 1990 मधलं बिहार करायचे आहे का असा सवालच त्यांनी उपस्थित केला आहे. सामान्य माणसे रत्नागिरीतील व्यवस्थेबद्दल बोलायला आली होती, त्यांना व्यक्तीबद्दल बोलायचे नव्हते तरीही त्यांना बोलू दिले नाही, सभेत जे 50-60 जण घुसले त्यातले अर्धे मुस्लिम होते त्यांच्यात गुन्हेगारी पार्श्वभूमीची माणसे होती. म्हणजे अशा लोकांना घेऊन नागरिकांना धमकावयचा, त्यांना घाबरावयचा अधिकार कोणी दिला ? असा सवाल निलेश राणे यांनी उपस्थित केला आहे. गुन्हेगारांना सोबत घेऊन लोकांना धमकावले गेले, धक्काबुक्की केली गेली, हातातला माईक काढून घेतला गेला, पोलीस यावर कोणती ॲक्शन घेणार असा सवाल निलेश राणे यांनी केला आहे.

याच सभेत घुसलेल्यानी महामार्गाचा मांडलेल्या मुद्द्याचाही निलेश राणे यांनी समाचार घेतला. महामार्गाच्या मुद्द्यावर गडकरी सहेबांसोबत मीटिंग लावा , आणि कशामुळे केवळ रत्नागिरीचा भाग आतापर्यंत अपूर्ण राहिला याचाही हिशेब लागला पाहिजे, बाकीचा महामार्ग होतो रत्नागिरीचा भाग का रखडतो याचाही हिशोब झाला पाहिजे. आम्ही उगाच कोणावर टीका करत नाही पण आमच्या नेत्यांवर टीका केलीय तर ती अजून घेतली जाणार नाही. शिस्तीत वागा, रत्नागिरीत जर कुणाला विषयावर व्यवस्थेवर चर्चा करायची असेल तर ती झालीच पाहिजे. भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी, सहकाऱ्यांनी सुध्दा गप्प बसू नका, माझी येण्याची वाट न बघता आपण या मातीचे देणे लागतो हे समजून मैदानात उतरा, लोकांची साथ द्या , लोकांची चर्चा करायची असेल तर लावा चर्चासत्र व्यक्तीवर नाही विषयांवर चर्चा करू मीही त्या चर्चासत्रात येतो. आता सभा उधळतायेत, घोषणा देतायत उद्या घरात घुसायला मागेपुढे पाहणार नाहीत. सामान्य लोकांच्या अंगावर जाताहेत उद्या तुमच्या अंगावर जातील, कोणावरही हात टाकतील त्याची वाट बघायची का ? मी सुध्दा युतीचा कार्यकर्ता आहे पण सामान्य माणसावर हात टाकला जात असेल तर ते मी सहन करणार नाही , भाजपा कार्यकर्त्यांनी लोकांची बाजू घेऊन मैदानात उतरा असेही नीलेश राणे म्हणाले.

Team RatnagiriLive

कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button