महाराष्ट्ररत्नागिरी अपडेट्सलोकल न्यूजस्पोर्ट्स
जिल्हास्तरीय कॅरम स्पर्धेत आली पाटणकर प्रथम ; विभागीय स्तरावर निवड
रत्नागिरी : येथे पार पडलेल्या १९ वर्षांखालील वयोगटात नवनिर्माण शिक्षण संस्थेच्या रत्नागिरी येथील नवनिर्माण कनिष्ठ महाविद्यालयातील बारावी विज्ञान शाखेतील आली पाटणकर याने जिल्हास्तरीय कॅरम स्पर्धेत प्रथम पटकाविला
अली पाटणकर याने दिवसभरात सहा सामने जिंकत अभ्यंकर, कुलकर्णी गोगटे जोगळेकर बरोबरचा अंतिम सामना 18 – 10 अशा मोठ्या फरकाने जिंकली. अली पाटणकर यांची विभागीय स्पर्धेत निवड झाली.
अली यांनी मिळविलेल्या यशाबद्दल नवनिर्माण शिक्षण संस्थेचे चेअरमन अभिजित हेगशेट्ये संचालिका सीमा हेगशेट्ये महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. आशा जगदाळे क्रीडा शिक्षक हर्ष शिरसाट मार्गदर्शक प्रा. रोहित यादव महाविद्यालयातील शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी अभिनंदन केले आणि पूढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.