जिल्हा बँकेकडून सभासदांना ३० टक्के लाभांश ; डॉ. तानाजी चोरगे यांचा सत्कार
लांजा : रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सह. बँकेचे अध्यक्ष डॉ. तानाजीराव चोरगे यांनी सभासदांना दिलेल्या ३० टक्के लाभांशासाठी लांजा तालुका विविध कार्यकारी सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांनी डॉ चोरगे यांचा जाहीर सत्कार केला.
शुक्रवारी रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती बँकेची वार्षिक सर्वसाधारण सभा झाली या सभेत अध्यक्ष श्री तानाजीराव चोरगे यांनी सहकारी बँक यांच्या इतिहासात प्रथमच 30 टक्के लाभांश सभासदांना देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला जिल्हा बँकेचे सहकारी सोसायटी यांना असलेले सहकार्य याबद्दल लांजा तालुक्यातील विविध सहकारी सोसायटी सर्व चेअरमन यांनी डॉ. तानाजीराव यांचा यासभेत शाल श्रीफळ, विठ्ठल रखुमाई प्रतिमा देऊन सत्कार केला.
यावेळी उपाध्यक्ष बाबाजी जाधव लांजातील बँकेचे संचालक अजित यशवंतराव, महेश खामकर यांच्यासह लांजा तालुका खरेदी विक्री संघाचे चेअरमन सुभाष लाखण तळवडे विविध कार्यकारी सोसायटीचे विजय पाटोळे, आरगावचे रवींद्र खामकर, हसोळ कमलाकर यशवंतराव, मठचे सुभाष पवार कोंड्ये पड्यार आदी सर्व चेअरमन आणि पदाधिकारी उपस्थित होते.