क्राईम कॉर्नरब्रेकिंग न्यूजमहाराष्ट्ररत्नागिरी अपडेट्सलोकल न्यूज

बोगस सोशल मीडिया अकाउंटद्वारे साडेतीन लाखांची फसवणूक ; सायबर चोरांना राजस्थानात जाऊन पकडले

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यातील एका प्रतिष्ठित व्यक्तीच्या नावे बनावट फेसबुक अकाऊंट आणि व्हॉट्सअपचा वापर करून सीआरपीएफ तसेच आर्मी अधिकारी असल्याचे सांगून फर्निचर स्वस्तात विकण्याचे आमिष दाखवत ३ लाख ३१ हजार रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी रत्नागिरीच्या सायबर शाखेच्या पोलिसांनी राजस्थान येथील दोन आरोपींना अटक केली आहे.

या संदर्भात फिर्यादी यांच्या तक्रारीवरून सायबर पोलीस ठाणे, रत्नागिरी येथे गुन्हा रजि. नं. ०४/२०२४ अन्वये भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ३१८(४), ३१९(२) तसेच माहिती तंत्रज्ञान अधिनियम २००० चे कलम ६६(सी) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता.
या तक्रारीनुसार सायबर पोलिसांनी बँक व्यवहारांचे तांत्रिक विश्लेषण करून आरोपींचा माग काढला. त्यानुसार दिनेश कुमार मीना व राकेश कुमार मीना, दोघेही भचुंडला, अचनेरा, डालोत, प्रतापगढ, राजस्थान येथील रहिवासी असल्याचे निष्पन्न झाले. स्थानिक खबऱ्याच्या मदतीने आणि मोबाईल लोकेशन नसतानाही पोलिसांनी तांत्रिक मार्गाने तपास करून दोन्ही आरोपींना ताब्यात घेतले व ४ दिवसांची पोलीस कोठडी मिळवली.
ही कारवाई रत्नागिरीचे पोलीस अधीक्षक श्री. धनंजय कुलकर्णी आणि अपर पोलीस अधीक्षक श्रीमती जयश्री गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सायबर पोलिस ठाण्याच्या प्रभारी अधिकारी पोनि. स्मिता सुतार, सपोनि. नितीन पुरळकर, पोहवा रामचंद्र वडार, विनोद कदम, व पोशि. अजिंक्य ढमढेरे यांनी केली.

अशी आहे सायबर चोरांची ट्रिक

“सीआरपीएफ/आर्मीमध्ये अधिकारी असल्याचे भासवून फर्निचर किंवा वाहने कमी दरात विकण्याचे आमिष दाखवणाऱ्यांपासून सावध राहावे”, असे आवाहन रत्नागिरी पोलिसांनी नागरिकांना केले आहे.

Team RatnagiriLive

कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button