क्राईम कॉर्नरब्रेकिंग न्यूजमहाराष्ट्ररत्नागिरी अपडेट्सराष्ट्रीयलोकल न्यूज

भारतीय नौदलाचे दिसताच क्षणी गोळ्या घालण्याचे आदेश

  • भारत-पाक युद्धजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर समुद्रात मासेमारी प्रतिबंधित क्षेत्र जाहीर

रत्नागिरी : भारत पाकिस्तान युध्दाच्या पार्श्वभूमीवर नौदल विभाग व मत्स्यव्यवसाय विभागाची ७ मे रोजी बैठक आयोजित करण्यात आली होती. बैठकीमध्ये भारतीय नौदल विभागाकडून खालील नमूद ठिकाणी ऑफशोअर डिफेन्स एरिया (Offshore Defence Area ODA) मासेमारी प्रतिबंध क्षेत्र (No Fishing Zone) घोषित करण्यात आले आहे. नौदल विभागाने आखून दिलेल्या उपरोक्त परिसरामध्ये कोणतीही नौका आढळून आल्यास “दिसताच क्षणी गोळ्या घालणे (शूट टु किल)” चे आदेश नौदल विभागास देण्यात आलेले आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण एम देवेंदर सिंह यांनी दिली.
MH/BASSEIN 18°31’45″N, 072°09’40″E. 18°32′04″N, 071°09’08″E. 19°46′49″N, 072°11’27″E. 19°46′42″N, 072°11’36″E.

NEELAM 18°49’11″N, 072°10’00″E. 18°49’23″N, 072°25’01″E. 18°09’59″N, 072°25’13″E. 18°10’12″N, 072°10’00″E.
वरील ठिकाणी कोणतीही मासेमारी नौका मासेमारीस वा अन्य कोणत्याही प्रयोजनास जाणार नाही तसेच नौदल विभागाने आखून दिलेल्या उपरोक्त परिसरामध्ये कोणतीही नौका आढळून आल्यास “दिसताच क्षणी गोळया घालणे (शूट टु किल)” चे आदेश नौदल विभागास देण्यात आलेले आहेत. तरी सदरील ठिकाणी आपले अधिनस्त कोणतीही मासेमारी नौका जाणार नाही याबाबतची दक्षता सर्व नौका मालक व मच्छिमार यांनी घ्यावी. मच्छिमार नौकांच्या सर्वेक्षणाकरीता नौदल विभागाकडून संस्थानिहाय नौकांची माहिती मागविण्यात आली असल्याने सदर माहिती परवाना अधिकारी यांच्यामार्फत तात्काळ सहायक आयुक्त मत्स्यव्यवसाय या कार्यालयास सादर करावी, असेही जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण श्री. सिंह यांनी कळविले आहे.

Team RatnagiriLive

कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button