महाराष्ट्ररत्नागिरी अपडेट्सलोकल न्यूज
रत्नागिरीत आज इज्तिमाचे आयोजन

रत्नागिरी दि. ७ सप्टेंबर : दावते इस्लामी शाखा रत्नागिरी तर्फे आला हजरत उर्स निमित्त रत्नागिरीतील कोकणनगर फैजाने अत्तार येथे आज इज्तिमाचे आयोजन करण्यात आले आहे.

या संदर्भात आयोजकांकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार इज्तिमा रात्री ९ वाजता सूरु होणार आहे. या इज्तिमामध्ये सर्व मुस्लिम बांधवांनी सहभागी व्हावे, असे आवाहन दावते इस्लामी शाखा रत्नागिरीतर्फे करण्यात आले आहे. इज्तिमानंतर सर्वांना नियाजचे वाटप करण्यात येणार आहे