ब्रेकिंग न्यूजमहाराष्ट्ररत्नागिरी अपडेट्सरेल्वे अपडेट्स & ट्रॅव्हललोकल न्यूज

उन्हाळी सुट्टीत कोकणात जाणाऱ्यांसाठी खुशखबर!

  • मुंबई-मडगाव दरम्यान धावणार ‘समर स्पेशल’ ट्रेन; पाहा वेळापत्रक

रत्नागिरी : उन्हाळी सुट्ट्यांच्या काळात कोकणात जाणाऱ्या प्रवाशांची होणारी गर्दी लक्षात घेता, मध्य रेल्वे आणि कोकण रेल्वेच्या समन्वयाने मुंबई ते मडगाव दरम्यान विशेष साप्ताहिक गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. १६ एप्रिल २०२६ पासून या गाड्यांच्या फेऱ्या सुरू होणार असून, यामुळे चाकरमान्यांचा प्रवास अधिक सुखकर होणार आहे.

​प्रवाशांच्या सुविधेसाठी मुंबई सीएसएमटी – मडगाव आणि एलटीटी – मडगाव अशा दोन विशेष गाड्यांच्या जोड्या जाहीर करण्यात आल्या आहेत.

​१. मुंबई सीएसएमटी – मडगाव – मुंबई सीएसएमटी स्पेशल (साप्ताहिक)

  • गाडी क्र. ०११७१: मुंबई सीएसएमटी येथून १६ एप्रिल ते ११ जून २०२६ या कालावधीत दर गुरुवारी मध्यरात्री ००:२० वाजता सुटेल आणि त्याच दिवशी दुपारी १५:१५ वाजता मडगावला पोहोचेल.
  • गाडी क्र. ०११७२: मडगाव येथून १६ एप्रिल ते ११ जून २०२६ या कालावधीत दर गुरुवारी दुपारी १६:०० वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी पहाटे ०३:४५ वाजता मुंबई सीएसएमटीला पोहोचेल.

प्रमुख थांबे: दादर, ठाणे, पनवेल, पेण, रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, सावर्डे, आरवली रोड, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली, विलवडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी रोड, थिविम आणि करमळी.

कोच रचना: एकूण २२ डबे (२ टायर एसी- १, ३ टायर एसी- ६, स्लीपर- ९, जनरल- ४, एसएलआर- २).

​२. लोकमान्य टिळक टर्मिनस (LTT) – मडगाव – LTT स्पेशल (साप्ताहिक)

  • गाडी क्र. ०१११९: एलटीटी येथून १७ एप्रिल ते १२ जून २०२६ दरम्यान दर शुक्रवारी मध्यरात्री ००:५५ वाजता सुटेल आणि त्याच दिवशी दुपारी १५:१५ वाजता मडगावला पोहोचेल.
  • गाडी क्र. ०११२०: मडगाव येथून १७ एप्रिल ते १२ जून २०२६ दरम्यान दर शुक्रवारी दुपारी १६:०० वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी पहाटे ०३:३० वाजता एलटीटीला पोहोचेल.

प्रमुख थांबे: ठाणे, पनवेल, पेण, रोहा, माणगाव आणि वरीलप्रमाणे सर्व प्रमुख स्थानके.

कोच रचना (LHB कोच): एकूण २१ डबे (फर्स्ट एसी- १, २ टायर एसी- ३, ३ टायर एसी- ७, स्लीपर- ८, जनरेटर कार- २).

​बुकिंग कधी सुरू होणार?

​गाडी क्रमांक ०११७२ आणि ०११२० चे बुकिंग १७ मार्च २०२६ पासून सर्व आरक्षण केंद्रांवर (PRS), इंटरनेट आणि IRCTC च्या अधिकृत वेबसाईटवर सुरू होईल.

महत्त्वाची टीप: प्रवाशांनी रेल्वेच्या अधिकृत वेबसाईट (www.enquiry.indianrail.gov.in) किंवा ‘KR Mirror’ ॲपवरून अधिक सविस्तर माहिती तपासून घ्यावी, असे आवाहन रेल्वे प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

Team RatnagiriLive

कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button