महाराष्ट्ररत्नागिरी अपडेट्सरेल्वे अपडेट्स & ट्रॅव्हललोकल न्यूज
Konkan Railway | कोकण रेल्वेसाठी प्राण गमावलेल्या कामगार, अभियंते यांना स्मृती दिनी आदरांजली
रत्नागिरी : कोकण रेल्वेचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक श्री. संतोष कुमार झा, रत्नागिरी जिल्हा पोलिस अधीक्षक धनंजय कुलकर्णी, कोकण रेल्वेचे अधिकारी आणि कर्मचारी यांच्यासह अनेकांनी सोमवारी आदरांजली वाहिली.दरवर्षी स्मृतिदिनाचे औचित्य साधून या दिवशी रत्नागिरीतील ‘श्रमशक्ती स्मारक’ येथे कोकण रेल्वेच्या उभारणीच्या कामादरम्यान आपले प्राणांचे बलिदान देणाऱ्या कामगार अभियंते तसेच अधिकारी यांना आदरांजली वाहिली जाते. येथील रेल्वे स्थानकासमोर स्मृतीस स्तंभ येथे हा आदरांजली वाहणारा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.