ब्रेकिंग न्यूजमहाराष्ट्ररत्नागिरी अपडेट्सरेल्वे अपडेट्स & ट्रॅव्हललोकल न्यूज

Konkan Railway | कोकणातून बिहारला जाणाऱ्या एक्सप्रेसच्या फेऱ्या वाढवल्या

रत्नागिरी :  प्रवाशांच्या सोयीसाठी एक महत्त्वाची घोषणा करण्यात आली आहे. गाडी क्रमांक 07311 / 07312 वास्को द गामा – मुझफ्फरपूर – वास्को द गामा विशेष रेल्वेच्या (Vasco Da Gama – Muzaffarpur Special Train) फेऱ्या वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे उत्तर भारताकडे जाणाऱ्या आणि कोकण रेल्वे मार्गावरील प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.

गोव्यातील वास्को-द-गामा ते मुजफ्फरपुर दरम्यान या गाडीच्या फेऱ्या २ जूनपर्यंत होणार होत्या. आता ही गाडी ९ जून पर्यंत धावणार आहे. मुजफ्फरपुर ते वास्को दरम्यान या गाडीच्या फेऱ्या दिनांक ५ जून पर्यंत होणार होत्या आता ही गाडी 12 जून पर्यंत विस्तारित करण्यात आली आहे.


या विशेष रेल्वेची रचना आणि वेळापत्रक पूर्वीप्रमाणेच राहणार आहे, त्यामुळे प्रवाशांना कोणत्याही बदलाशिवाय प्रवास करता येणार आहे. ही बातमी उत्तर प्रदेश, बिहार आणि गोव्याकडे प्रवास करणाऱ्या हजारो प्रवाशांसाठी अत्यंत उपयुक्त ठरेल.
मुख्य मुद्दे:

  • रेल्वे गाडी क्रमांक: 07311 / 07312
  • मार्ग: वास्को द गामा – मुझफ्फरपूर – वास्को द गामा
  • प्रकार: विशेष रेल्वे (Special Train)
  • वैशिष्ट्य: फेऱ्यांची मुदतवाढ (Periodicity Extended)
  • बदल: रचना आणि वेळेत कोणताही बदल नाही (Same Composition & Timings)
    प्रवाशांनी या संधीचा लाभ घ्यावा आणि आपले तिकीट लवकर बुक करावे, असे आवाहन रेल्वे प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

Team RatnagiriLive

कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button