Sports News | राष्ट्रीय किक बॉक्सिंग स्पर्धेत रत्नागिरीची बाजी
रत्नागिरी : नुकत्याच परेड ग्राउंड देहराडून उत्तराखंड येथे संपन्न झालेल्या वाको इंडिया कॅडेट, जुनियर व सीनियर नॅशनल किक बॉक्सिंग चॅम्पियनशिप 2023 या राष्ट्रीय स्पर्धेत महाराष्ट्र राज्याचे प्रतिनिधित्व करताना रत्नागिरी जिल्ह्यातील खेळाडूंनी 1 सुवर्ण, 4 रौप्य व 2 कांस्यपदक प्राप्त करीत रत्नागिरी जिल्हाचे नाव उंचावले.
या स्पर्धेत13-15 वर्षे मुलींमध्ये 55 किलो खालील वजन गटात सुखदा गावडे – रौप्य पदक , 16 ते 18 वर्षे वयोगटात मुलांमध्ये पॉईंट फायटिंग प्रकारात 69 किलोखालील वजन गटात दीप मोरे- कांस्यपदक , सुजल गावनंग- कांस्य पदक लाईट कॉन्टॅक्ट प्रकारात 63 किलो खालील वजन गटात रुपम बोबले- रौप्य पदक, 69 किलो खालील वजन गटात दीप मोरे -रौप्य पदक, 19 ते 40 वर्ष वयोगटात पुरुषांमध्ये किक लाईट प्रकारात 74 किलो खालील वजन गटात स्वानंद खेडेकर- रौप्य पदक, 19 ते 35 वर्षे वयोगटात महिलांमध्ये पॉइंट फायटिंग प्रकारात 70 किलो खालील वजन गटात स्वप्नाली पवार – सुवर्णपदक प्राप्त केले.
यशस्वी खेळाडूंना जिल्हा संघटनेच्या सचिव व आंतरराष्ट्रीय खेळाडू डॉ. योगिता खाडे, हुजैफा ठाकूर, विनोद राऊत, स्वप्नाली पवार,प्रणित सावंत, मंदार साळवी यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.
स्पर्धेतील प्रविण्यप्राप्त खेळाडूंचे जिल्हा संघटनेचे अध्यक्ष अजय खाडे, उपाध्यक्ष सुयोग सावंत, वाको इंडिया किकबॉक्सिंग असोसिएशनचे अध्यक्ष श्री. सी. ए. तांबोळी, सचिव संजीवकुमार जाग्रा सर महाराष्ट्र किक बॉक्सिंग असोसिएशनचे सचिव बापूसाहेब घुले सर यांनी अभिनंदन केले आणि पुढील वाटचालीकरिता शुभेच्छा दिल्या.