महाराष्ट्ररेल्वे अपडेट्स & ट्रॅव्हल
कोकण रेल्वेकडून स्वातंत्र्य दिन साजरा
नवी मुंबई : भारताच्या स्वातंत्र्य दिनानिमित्त, कोकण रेल्वेचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक श्री. संतोष कुमार झा यांनी कोकण रेल विहार, नेरुळ, नवी मुंबई येथे राष्ट्रीय ध्वज फडकवला आणि रेल्वे सुरक्षा दलाच्या (आरपीएफ) तुकडीची पाहणी केली.
यानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या सभेला संबोधित करताना, श्री संतोष कुमार झा यांनी कोकण रेल्वेच्या सर्व कर्मचाऱ्यांनी दर्शविलेल्या अप्रतिम संघभावना आणि समर्पणाचे कौतुक केले. त्यांनी संस्थेच्या वाढी आणि यशासाठी आपले परिश्रम सुरू ठेवण्याचे आवाहन केले. यासोबतच, कोकण रेल्वेच्या उत्कृष्टतेच्या प्रतिबद्धतेला अधोरेखित करणारी काही महत्त्वाची उपलब्धी आणि भविष्यातील उपक्रम देखील त्यांनी मांडले.