जायंट्स ग्रुप ऑफ रत्नागिरीतर्फे उंडण जातीच्या रोपांची लागवड
रत्नागिरी : जायंटस् ग्रुप ऑफ रत्नागिरी या सेवाभावी ग्रुपची स्थापना होऊन २४ ऑगस्ट २०२४ रोजी २० वर्ष पूर्ण झाली त्यानिमित्त मिऱ्याबंदर जवळ ३० उंडन जातीची झाडे रस्त्याच्या कडेला लावण्यात आली आहेत. या झाडांची रोपे मावळंगे येथील मॅग्रोव नर्सरीचे प्रोप्रायटर संतोष तोस्कर यांनी मोफत दिली आहेत.
उंडन झाडांचे प्रमाण सध्या अत्यल्प झाले आहे. यासाठी झाडांची लागवड मोठ्या प्रमाणात व्हावी हा या मागचा उद्देश होता. उंडन ह्या झाडाचे फळ खाण्यासाठी मोठ्या प्रमाणात पक्षी येतात. तसेच त्या फळापासून औषधी तेल देखील निर्माण केले जाते. शनिवारी रत्नागिरीत भरपूर पाऊस पडत असताना देखील जायंटस् ग्रुपचे अध्यक्ष, श्री. लक्ष्मीकांत (बाबु) भुते, इतर सदस्य, डॉ.मिलिंद सावंत, श्री.संजय पाटणकर, श्री.विनय जोशी, श्री.सचिन बारटक्के, श्री.संतोष कदम यांनी मेहनत घेवुन उंडन रोपांचे वृक्षारोपण करून ग्रुपचा विसावा वर्धापन दिन साजरा करण्यात आला.