बँक ऑफ बडोदातर्फे वृक्षारोपणासह दिव्यांग विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप
उरण दि २३ (विठ्ठल ममताबादे ) : भारतातील अग्रगण्य असलेल्या बँक ऑफ बडोदाच्या ११७ व्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून बँकिंग क्षेत्रात प्रसिद्ध असलेल्या बँक ऑफ बडोदा शाखा आनंदनगरतर्फे उरण येथे वृक्षारोपण करण्यात आले. तसेच स्वामी ब्रह्मानंद प्रतिष्ठान स्कूल बोरी येथे दिव्यांग विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले.
वर्धापन दिनानिमित्त बँक ऑफ बडोदाने संपूर्ण भारतात विविध सामाजिक शैक्षणिक पर्यावरणपूरक उपक्रम राबविले आहेत.बँक ऑफ बडोदा ही भारतातील विश्वसनीय, गुणवत्तापूर्ण अशी बँक असून सदर बँक ग्राहकांना तत्पर सेवा देण्यास कटीबद्ध असल्याचे बँक ऑफ बडोदा आनंद नगर शाखा उरणचे ब्रँच मॅनेजर ओमप्रकाश सिंग यांनी यावेळी सांगितले.
बँकेचे कर्मचारी मोजेस कोळी या प्रसंगी उपस्थित होते. बँक ऑफ बडोदा मध्ये वर्धापन दिन साजरा करून बँक ऑफ बडोदातर्फे विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात आल्याने नागरिकांनी सदर उपक्रमाचे कौतुक केले.