जगाच्या पाठीवरमहाराष्ट्रराष्ट्रीयस्पोर्ट्स

भविष्यात अविराज गावडे भारतीय संघात दिसावा

  • पालकमंत्री उदय सामंत यांनी अविराज गावडे याला दिल्या शुभेच्छा

रत्नागिरी : आज रत्नागिरी साठी विशेषता कोकणासाठी आनंदाचा दिवस आहे. लंडनमध्ये क्रिकेटची कौन्टी स्पर्धा होतात त्यामध्ये खेळण्यासाठी महाराष्ट्रातील दोघांची निवड झाली आहे त्यामध्ये रत्नागिरीचा अविराज गावडे हा लंडन येथे खेळायला जात आहे त्यामुळे रत्नागिरी क्रिकेट असोशियन मार्फत व रत्नागिरी जिल्हया मार्फत व कोकणामार्फत मी त्याचे अभिनंदन करतो त्याच्या भविष्याच्या वाटचालीसाठी शुभेच्छा देतो भविष्यात अविराज हा भारतीय संघात दिसावा यासाठी आपण त्याला शुभेच्छा देत असल्याचे रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत यांनी लंडन दौऱ्यावर निघालेल्या अविराज गावडे यांना शुभेच्छा देताना सांगितले.

लंडन येथे क्रिकेटच्याकौन्टी स्पर्धा खेळण्यासाठी अविराज अनिल गावडे हा पाच तारखेला लंडन येथे रवाना होत आहे त्यासाठी त्याने रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांची भेट घेतली त्यावेळी सामंत यांनी त्याला शुभेच्छा दिल्या यावेळी क्रिकेट असोशियनचे बिपिन बंदरकर अविराज याचे वडील अनिल गावडे तसेच बाबू म्हाप आदी मान्यवर उपस्थित होते.

अविराज याची इंग्लंडमधील लंडन येथे होणाऱ्या कौन्टी क्रिकेट स्पर्धेसाठी निवड झाली असूनकौन्टी स्पर्धा ही सर्व युरोपियन देशाची सिलेक्शन टूर्नामेंट आहे त्यातून प्रत्येक युरोपियन देशाचे टीमची निवड केली जाते अविराज ह्याची मिडल सेक्स संघाकडून स्पर्धेसाठी खेळण्यासाठी निवड झाली आहे. मिडल सेक्स संघाकडून प्रीमियर क्रिकेट लीग खेळण्यासाठी सुद्धा त्याची निवड झाली आहे अशा दोन्ही टूर्नामेंटसाठी अविराज याची निवड झाल्याने त्याचे कौतुक करण्यात येत आहे लंडन येथे कौन्टीच्या 16 मॅचेस तर प्रीमियर लीगच्या 14 मॅचेस अशा एकूण 30 मॅचेस होणार असून १० मे ते ६ सप्टेंबर या चार महिन्याच्या कालावधीत त्या स्पर्धा चालणार आहेत.

अविराज हा सध्या मेट्रो क्रिकेट क्लब पुणे येथे निरंजन गोडबोले यांच्या मार्गदर्शनाखाली खेळत आहे मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या कर्नाटक स्पोर्टिंग असोसिएशन डिव्हिजन ए च्या मॅचेस खेळताना त्याची ही निवड झाली आहे. या मॅचेस मध्ये त्याच्या प्रभावी गुगली च्या शैलीमुळे सिलेक्टरनी त्यांची निवड झाली आहे.

आपण लंडन येथे होणाऱ्या स्पर्धेत चांगली कामगिरी करून रत्नागिरी व कोकणासह देशाचे नाव उज्वल करू, अशी प्रतिक्रिया अविराज याने व्यक्त केली आहे.

Team RatnagiriLive

कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button