‘मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण’ योजनेच्या पात्र लाभार्थ्यांच्या बँक खात्याशी आधार क्रमांक जोडण्यासाठी मोहीम राबवा
-
महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांचे निर्देश
१७ ऑगस्ट रोजी प्रत्येक जिल्ह्यात पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली लाभ वितरण कार्यक्रम घेण्यात यावे
१७ ऑगस्ट रोजी प्रत्येक जिल्ह्यात पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली लाभ वितरण कार्यक्रम घेण्यात यावे
मुंबई, दि. 13 – मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभाचे वितरण येत्या 17 ऑगस्ट रोजी करण्यात येणार आहे. दि.31 जुलै पर्यंत अर्ज केलेल्या पात्र लाभार्थी महिलांना आधार जोडणी केलेल्या त्यांच्या बँक खात्यात थेट लाभ मिळणार आहे. ज्या पात्र महिलांच्या बँक खात्याशी आधार जोडणी झालेली नाही, अशा लाभार्थ्यांचे बँक खात्याशी आधार क्रमांक जोडून घेण्यासाठी जिल्ह्यात विशेष शिबिरांचे आयोजन करावे. आधार जोडणी झाल्यावर या पात्र लाभार्थ्यांच्या खात्यात योजनेचा लाभ मिळणार आहे, असे महिला व बालविकास मंत्री कु. अदिती तटकरे यांनी आज येथे सांगितले.
मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात महिला व बालविकास मंत्री कु. तटकरे यांनी आज राज्यातील सर्व विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी व महिला व बालविकास अधिकारी यांच्याशी दूरदृश्य संवाद प्रणालीद्वारे आढावा घेतला. त्यावेळी त्या बोलत होत्या. महिला व बालविकास विभागाचे प्रधान सचिव अनुपकुमार यादव, महिला व बालविकास आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरे आदी यावेळी उपस्थित होते.