रेल्वे अपडेट्स & ट्रॅव्हल
कोकण एसटीप्रेमी ग्रुपतर्फे धाराशिव-पणजी बससाठी नवीन मार्गफलक भेट
रत्नागिरी : कोकण एसटी प्रेमी ग्रुपचे सदस्य श्री.मयूर शिरसाट ह्यांच्या तर्फे धाराशिव आगाराकडून चालविण्यात येणाऱ्या धाराशिव – पणजी – धाराशिव या मार्गावरील बस सेवेसाठी नवीन मार्ग फलक नुकताच भेट स्वरूपात देण्यात आला.
धाराशिव ते पणजी मार्गावर धावणाऱ्या बस सेवेसाठी मार्ग फलक देताना राज्य परिवहन महामंडळाच्या धाराशिव आगारचे चालक वाहक तसेच कोकण एसटी प्रेमी ग्रुपचे सदस्य मयूर शिरसाट उपस्थित होते.