Konkan Railway | गणेशोत्सवात धावणारी दिवा- रत्नागिरी मेमू स्पेशल ट्रेन करंजाडीसह अंजनीला थांबणार!
रत्नागिरी : दिवा ते रत्नागिरी या गणेशोत्सवात जाहीर करण्यात आलेल्या मेमू स्पेशल ट्रेन ला करंजाडी तसेच अंजनी हे आणखी दोन थांबे वाढवण्यात आले आहेत.
पुढील महिन्यात होणाऱ्या गणेशोत्सवासाठी दिवा ते रत्नागिरी तसेच दिवा ते चिपळूण अशा दोन मेमो स्पेशल गाड्या जाहीर करण्यात आल्या आहेत. या गाडीपैकी दिवा ते रत्नागिरी दरम्यान धावणाऱ्या 01153/01154 या मेमू स्पेशल ट्रेनला करंजाडी तसेच अंजनी हे दोन वाढीव थांबे देण्यात आले आहेत. यानुसार गणेशोत्सवात धावणारी दिवा रत्नागिरी मेमू स्पेशल ट्रेन करंजाळी स्थानकावर सकाळी दहा वाजून 40 मिनिटांनी येईल तर खेड चिपळूण दरम्यानच्या अंजनी स्थानकावर ती 11 वाजून 45 मिनिटांनी येईल.
परतीच्या प्रवासात रत्नागिरी ते दिवा दरम्यान धावणाऱ्या मेमू स्पेशल ट्रेन अंजनी स्थानकावर सायंकाळी 5.32 मिनिटांनी तर करंजाडी स्थानकावर ती सायंकाळी 6.30 वाजता पोहोचेल.
दिवा रत्नागिरी गणपती स्पेशल मेमू स्पेशल गाडीला अंजनी तसेच करंजाडी स्थानकावर वाढीव थांबे मंजूर केल्याने मुंबईतून गणेशोत्सवासाठी गावी येणाऱ्या चाकरमान्यांची गैरसोय टाळणार आहे.