उलवे येथे नवीन फौजदारी कायद्या विषयी मार्गदर्शन
उरण दि २९ (विठ्ठल ममताबादे ) : शुक्रवार दि १/७/२०२४ पासून देशात नवीन फौजदारी कायदा अस्तित्वात येणार असून या नवीन फौजदारी कायद्याची जनतेला ओळख व्हावी, नवीन कायद्या विषयी जनतेत जनजागृती व्हावी या अनुषंगाने नवी मुंबई पोलीस आयुक्तालय अंतर्गत न्हावा शेवा पोलीस ठाणे आणि आम्ही उलवेकर मित्र मंडळ व महिला मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने सचिन राजे येरुणकर यांच्या अध्यक्षतेखाली जे नवीन कायदे लागू होणार आहेत त्या बद्दल अंजुमन बागवान – वरिष्ठ पोलीस निरीक्षक न्हावा शेवा बंदर यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.
श्री. सिद्धिविनायक गणपती मंदिर सेक्टर १७, उलवे येथे हे मार्गदर्शन शिबीर पार पडले.या शिबिरात नागरिकांना विविध कायद्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक अंजुमन बागवान यांनी नागरिकांना दिली.
यावेळी रविशेठ पाटील-संस्थापक अध्यक्ष साई मंदिर वहाळ , सचिन घरत उपसरपंच,राजेंद्र घरत, राकेश घरत-अध्यक्ष सेक्टर ८, विनोद थोरात, संदीप पाटील, निलेश पाटील,रोहन खंडू,साई पैकडे, अंकुश साळवे आदी मान्यवर तसेच समस्त उलवे नोडमधील रहिवासी आणि विविध सामाजिक संस्था संघटनेचे पदाधिकारी मोठया संख्येने उपस्थित होते.