लांजात विद्युतभारित खांबाचा शॉक लागून गाईचा मृत्यू
लांजा : तालुक्यातील कणगवली येथे विद्युतभारित पोलचा शॉक लागून मारुती चव्हाण यांची गाय मृत्युमुखी पडल्याची घटना रविवारी सायंकाळी ४ वाजण्याच्या सुमारास घडली. या दुर्दैवी घटनेतून चव्हाण यांचा मुलगा साहिल हा थोडक्यात बचावला.
महावितरणचे कर्मचारी आणि लांजा पोलीस घटना स्थळी दाखल झाले होते. कणगवली वेताळ या ठिकाणी साहिल मारुती चव्हाण हा गुरे चारत होता. यावेळी कळपातील एक गाय विजेच्या पोलाजवळ चरत असताना अचानक तडफडायला लागली म्हणून गाईला वाचवण्याचा प्रयत्न साहिल याने केला. मात्र शॉक बसत असल्याने साहिल याने प प्रसंगावधान दाखवत आपला जीव वाचवला आणि वडील यांना या घटने संदर्भात माहिती दिली.
कणगवली पोलीस पाटील दयाराम चव्हाण यांनी लांजा येथील महावितरण कार्यालय आणि पोलीस यांनाही या संदर्भात कळवले. या घटनेत मारुती चव्हाण या शेतकऱ्याचे सुमारे २० हजार रुपयाचे नुकसान झाले आहे.