नांदगाव येथे कृषिदुतांकडून ढोल-ताशांच्या गजरात कृषी दिन साजरा

चिपळूणल : डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली अंतर्गत गोविंदरावजी निकम कृषी महाविद्यालयाच्या ( RAWE ) कृषी-रत्न संघाकडून नांदगावमधील न्यू इंग्लिश स्कूल नांदगाव येथे महाराष्ट्र कृषि दिन व श्री. वसंतरावजी नाईक याच्या जयंती निम्मित कृषी कार्यक्रम आयोजित करण्यात आला.
महाराष्ट्र कृषी दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमास खास करून ता. कृषी अधिकारी – श्री. शत्रुघ्न म्हेत्रे, सावर्डे पोलीस ठाण्याचे सहा. पोलीस निरीक्षक – श्री. जयंत गायकवाड, मंडल कृषी अधिकारी – श्री. पिसाळ सर ,कृषी पर्यवेक्षक – श्री. अशोक जाधव , कृषी सहायक – श्री.रवींद्र जगताप आमंत्रित केले होते.
कार्यक्रमात कृषी दिंडी – या दिंडीचे उद्घाटन सहा.पोलीस निरीक्षक जयंत गायकवाड यांच्या हस्ते करण्यात आले , मुख्य आकर्षण म्हणून चिपळूण तालुक्यातील श्री.प्रसाद भिंगार्डे यांची नामांकित शर्यतीमधील बैलगाडी बोलवण्यात आली होती. गावाच्या मुख्य बाजारातून ही कृषी दिंडी ढोलताशांच्या गजरात भर पावसात सुद्धा न थांबता निघाली होती.
तसेच कृषी-रत्न संघाकडून शाळेतील मुलांसाठी आयोजित करण्यात आलेल्या घोषवाक्य स्पर्धेतील मुले ही सामील झाली होती. 2) मुख्य कार्यक्रमामध्ये मा.श्री. वसंतराव नाईक व सरस्वती मातेचे पूजन करून या कार्यक्रमास सर्वात करण्यात आले, कृषी रत्न संघाच्या योगीराज कुंभार यांनी प्रास्ताविक मध्ये महाराष्ट्र कृषि दिनाचे महत्त्व सांगितले, त्या नंतर शत्रुघ्न म्हेत्रे यांनी मुलांना कृषी व शालेय शिक्षणाचे महत्त्व सांगितले तसेच Rawe च्या मुलांना त्यांनी मार्गदर्शन केले, पुढे श्री. जयंत गायकवाड यांनी मुलांना स्पर्धा परीक्षेचे महत्त्व व मार्गदर्शन केले. तसेच रुपेश भगत यांनी कोकणातील कमी होत चाललेल्या शेतीच प्रमाण व रासायनिक खतांचे होणारे परिणाम यावर आपले मत मांडले.
3) कृषी अवजारांचे प्रदर्शन – कृषी-रत्न संघाकडून आयोजित करण्यात आलेल्या पारंपरिक तसेच आधुनिक कृषी अवजारांचे उद्घाटन ता. कृषी अधिकारी – शत्रुघ्न म्हेत्रे यांच्या हस्ते करण्यात आले व RAWE च्या मुलानं कडून त्या अवजारांची माहितीही देण्यात आली. त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण ही केले गेले व गौरव मगदूम यांनी सर्वांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता केली.
या कार्यक्रमाचे नियोजन ऋषिकेश पवार , योगीराज कुंभार, रुपेश भगत, केदार पाटील, संकेत खरात, प्रथमेश शिखरे, प्रतीक माळी, प्रथमेश मगदूम, अनिकेत पाटील, नागेश रक्ते, साहिल पैंगरकर, आकाश नायर, आशिष श्रीकुमार यांनी केले होते आणि या कार्यक्रमाचा काटेकोरपणा व शिस्त पाहून शत्रुघ्न म्हेत्रे यांनी मला ही सर्व मुले भावी अधिकारी दिसत आहेत या शब्दात सर्व RAWE च्या मुलांचे कौतुक केले.