चिपळूणमध्ये निकम आयव्हीएफ क्लिनिक सुरू
चिपळूण : गुहागर बायपास मार्गावरील खेंड बावशेवाडी येथे सावर्डे येथील डॉ. अमोल निकम यांच्या निकम आयव्हीएफ क्लिनिकचे उद्घाटन त्यांच्या मातोश्री श्रीमती सुहासिनी निकम व माजी सभापती सौ. पूजा निकम यांच्या हस्ते फीत कापून करण्यात आले.
गेल्या काही वर्षांपासून डॉ. अमोल निकम यांचे आयव्हीएफ सेंटर सावर्डे येथे सुरू आहे. या रुग्णालयातून रुग्णांची सेवा करताना निकम यांचे समाज उपयोगी देखील उपक्रम सुरू असतात चिपळूण शहर व परिसरातील रुग्णांची सेवा करता यावी, यासाठी चिपळूण-गुहागर बायपास मार्गावरील खेंड बावशेवाडी येथे निकम आयव्हीएफ निकम क्लिनिक सुरू केले आहे.
यावेळी आ. शेखर निकम, ज्येष्ठ चित्रकार प्रकाश राजेशिर्के, सौ. युगंधरा राजेशिर्के , अंजली चोरगे, डाॅ निखिल चोरगे, डाॅ शमिका चोरगे, प्रदीप निकम, प्रशांत निकम, विकास निकम, तालुका वैद्यकिय अधिकारी डाॅ. ज्योती यादव मॅडम, डाॅ खेडकर, डाॅ. मणियार, डाॅ सुनिल निकम, डॉ. विक्रम खोत, डॉ. पूनम खोत. डाॅ नागेश वाघमारे, डाॅ वनिता सानप, चिपळुण लायन्स गॅलॅक्सी क्लब अध्यक्ष शमीना परकार, सुवर्णा वायकुळ,सावर्डे लायन्स क्लबचे अध्यक्ष सतीश सावर्डेकर, श्री. नेहेतराव, डाॅ. वर्षा खानविलकर, अजय उपरे, डाॅ. रश्मी पाटील, डाॅ. दर्शना पाटील, चिपळुण सीजीपीए चे डाॅ राकेश चाळके, डॉ. जयश्री चाळके, डॉ. अभिजीत सावंत, डॉ. मंगेश वाजे, डॉ. सुष्मिता विखारे, डॉ. तन्वी पाटील, डॉ. उमेश खेडेकर, डॉ. मीनाक्षी राऊत, डॉ. नितीन शिंदे, डॉ. स्वप्नील कदम, डॉ. अल्ताफ सरगुरोह, डॉ. दीपक विखारे आदींनी भेट देत डॉ. अमोल निकम यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.