लांजात मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाची साईडपट्टी खचली!
नावेरी नदीकाठच्या लोकांना सतर्कतेचा इशारा
लांजा : रविवार पाठोपाठ सोमवारही मुसळधार पावसाचा जोर कायम असून मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाची देवधे येथील साईडपट्टी खचली असून धनवडे शेती फॉर्म या ठिकाणी मोठे दगड खाली आले आहेत. मात्र यामुळे वाहतुकीला कोणताही अडथळा झालेला नाही. तालुक्यातून वाहणाऱ्या काजळी नदीने धोक्याची पातळी ओलांडले आहे. आंजणारी साटवली आणि नावेरी नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे.
दरम्यान, रविवारी लांजा तालुक्यात सरासरी 166 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. सोमवारी सकाळपासून पावसाचा जोर वाढलेला होता.
लांजा तालुक्यामधील मंडलनिहाय पर्जन्यमान याप्रमाणे :
दिनांक -08/07/2024
लांजा मंडल -158 मिमी
साटवली मंडल-162 मिमी
पुनस मंडल – 165 मिमी
भांबेड मंडल -172 मिमी
विलवडे मंडल – 175 मिमी
आजचा एकूण पाऊस -832 मिमी
आजचा सरासरी पाऊस = 166.4 मिमी
आज अखेर एकूण सरासरी पाऊस
1238.2+166.4=1404.6
पावसामुळे मुंबई गोवा महामार्गाची परिस्थिती अधिक बिकट झाली आहे. महामार्गाचे काम अर्धवट असल्याने मोठमोठे खड्डे आणि पाणी रस्त्यावर आल्याने वाहतुकीची गती कमी झाली आहे. काही ठिकाणी वाहतुकीची कोंडी होत आहे. लांजा शहरात तर परिस्थिती अत्यंत बिकट आहे वाहनधारकांना वाहन चालवताना त्रास सहन करावा लागत आहे. लांजा आसगे- दाभोळे रस्ता रस्त्यावर आजही अवजड आणि चिरे वाहतूक सुरू आहे. तळवडे घाटी येथे रस्ता परिस्थिती वाहनधारकांना त्रास देणारी आहे.
कालपासून सुरू असलेल्या मुसळधारbपावसाने ग्रामीण भागातील रस्ते यावरील माती वाहून गेलेली आहे. मुंबई गोवा महामार्ग देवधे येथे साईडपट्टी खचली आहे. धनावडे शेती फॉर्म या ठिकाणी धोकादायक दगड खाली आल्यामुळे वाहतुकीला धोका निर्माण झाला आहे.