लाडकी बहीण योजना : असा भरा ऑनलाईन फॉर्म
ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी अँप लिंक : https://play.google.com/store/apps/details?id=com.saaviinfinet.narishakti_yojana_doot
➡️अँप डाउनलोड केल्यानंतर अगोदर स्वतःचे रजिस्ट्रेशन करून घ्यावे
➡️ अँप मध्ये नारीशक्तीचा प्रकार : जर तुम्ही स्वतः फॉर्म भरत असाल तर स्वतः करावा, किंवा अन्य पर्याय निवडावा
➡️अँप मध्ये गेल्यावर सर्वात खाली ४ मेनू दिसतील त्यापैकी पहिला मेनू *नारीशक्ती दूत* वर क्लीक करावे.
➡️ क्लिक केल्यानंतर *मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना* वर क्लीक करा
➡️ फॉर्म उघडल्यानंतर संपूर्ण माहिती भरून घ्यावी
➡️ माहिती भरताना जन्माचे ठिकाण : ज्या ठिकाणी जन्म झाला ते ठिकाण, जिल्हा, गाव/शहर, ग्रामपंचायत / नगरपालिका / महानगरपालिका ही माहिती व्यवस्थित भरावी.
➡️ त्यानंतर स्टेप बाय स्टेप व्यवस्थित माहिती भरावी.
➡️ सर्वात खाली कागदपत्रे अपलोड करताना –
आधार कार्ड मध्ये *आधार कार्ड*
अधिवास / जन्म प्रमाणपत्र मध्ये *TC/जन्म प्रमाणपत्र (शासन निर्णयाच्या सुधारित आदेशानुसार कागदपत्रे)*
➡️ उत्पन्न प्रमाणपत्र मध्ये *उत्पन्न प्रमाणपत्र किंवा रेशन कार्ड*
➡️ हमीपत्र
➡️ बँक पासबुक
➡️ सध्याचा LIVE फोटो
वरील सर्व कागदपत्रे व्यवस्थित अपलोड करावी.
➡️ त्यानंतर खाली Accept करावे
➡️ माहिती जतन करा वर क्लिक करा
➡️ थोडा वेळ थांबा….तुम्ही टाकलेल्या मोबाईलवर OTP येईल
➡️ 4 अंकी OTP टाका
➡️ फॉर्म सबमिट करा.
आता तुमचा फॉर्म यशस्वीपणे सबमिट झालेला असेल.
➡️ आपण भरलेल्या अर्जाची स्थिती जाणण्यासाठी *केलेले अर्ज* या टॅब वर क्लीक करा.
➡️ तुम्ही जो अर्ज केला आहे त्याची स्थिती तुम्हाला जाणता येईल. त्यामध्ये तुम्हाला तुमचा अर्ज *Scheme: pending* मध्ये दिसेल.
अशा प्रकारे तुम्ही स्वतःहून तुमचा फॉर्म भरू शकता.