महाराष्ट्ररत्नागिरी अपडेट्सराजकीयलोकल न्यूजशिक्षण
लांजा तालुक्यातील ५५७० विद्यार्थ्यांना पावसाळी छत्र्यांचे वाटप
पालकमंत्री उदय सामंत आणि सिंधूरत्नचे कार्यकारी सदस्य किरण सामंत यांचा उपक्रम
लांजा : जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत आणि सिंधू रत्न चे कार्यकारी सदस्य किरण सामंत यांच्या वतीने सामाजिक बांधिलकी जपत लांजा तालुक्यातील २०८ शाळांमधीलल ५,५७० विद्यार्थ्यांना पावसाळी छत्र्यांचे वाटप करण्यात आले आहे.
या उपक्रमाचे शिक्षण प्रेमींकडून कौतुक होत आहे. प्राथमिक शाळा, हायस्कूल, इंग्रजी माध्यम शाळा या ठिकाणी छत्र्या वाटप करण्यात आले. दरम्यान लांजा तालुक्यात शैक्षणिक सुविधा आणि उच्च शिक्षण मिळण्यासाठी पालकमंत्री उदय सामंत यांनी कृषी महाविद्यालय होणार असल्याची सागितले आहे. लांजा तालुक्यात शैक्षणिक हब होण्यासाठी पालकमंत्री उदय सामंत यांनी पुढाकार घेतला आहे.