वृक्ष लागवडीसह संगोपनाचा केला सामूहिक संकल्प
संगमेश्वर : कृषीभूषण डॉ.तानाजीराव चोरगे शिक्षण व संशोधन संस्था संचलित, गोविंदरावजी निकम कृषी महाविद्यालय मांडकी पालवण अंतर्गत शेतकरी राजा संघाच्या विद्यार्थ्यांच्या हस्ते जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कळंबुशी परिसरात वृक्षारोपण करण्यात आले.
यावेळी गावचे प्रथम नागरिक माननीय सरपंच श्सचिन चव्हाण तसेच शाळेचे अध्यक्ष संदेश ठीक, उपाध्यक्ष सचिन वरवटकर आणि गावचे सर्व ग्रामस्थ यांच्या उपस्थितीत वृक्षारोपण करण्यात आले.
कार्यक्रमादरम्यान गावचे सरपंच श्री.सचिन चव्हाण यांनी विद्यार्थ्यांच्या मनामध्ये वृक्ष संगोपनाची आवड निर्माण व्हावी यासाठी त्यांना वृक्ष संगोपनाचे महत्व पटवून दिले. यावेळी कृषी प्रतिनिधी कु.रोहित कांबळे याने पर्यावरणाचे महत्त्व लक्षात यावे तसेच दिवसेंदिवस वाढत असलेल्या प्रदूषणावर नियंत्रण कसे मिळवावे या उद्देशाने वृक्षारोपण करणे गरजेचे आहे या विषयावर आपले मनोगत व्यक्त केले.
या प्रसंगी प्राथमिक शाळेचे शिक्षक व इतर कर्मचारी आणि कृषी विद्यार्थी अभिषेक भोसले, प्रशांत गाडे, संकेत लोखंडे, तनिष्क दुपारगुडे, सुराज पांढरे, रविराज पाटील, राहुल वाघमोडे, ओंकार क्षीरसागर, पृथ्वीराज अहिरेकर, वेदांत बाबर, दीप चौधरी या सर्वांनी वृक्षारोपण केले.