लाडकी बहीण योजना | पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते सोमवारी दापोली, खेड, मंडणगडसह गुहागरात शुभारंभ
रत्नागिरी, दि.२१ : राज्याचे उद्योगमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत हे उद्या सोमवार दि. 22 जुलैरोजी जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. दुपारी 12 वाजता मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण योजना दापोली, खेड, मंडणगड तालुका शुभारंभ डॉ.बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ सर विश्वेश्वरैय्या सभागृहात तर, सायंकाळी ४ वाजता श्रीपूजा सेवा मंगल कार्यालय, पाटपन्हाळे (खातू मसाले उद्योग समोर), ता. गुहागर येथे गुहागर तालुक्याचा त्यांच्या हस्ते शुभारंभ होणार आहे.
पालकमंत्री यांचा सविस्तर दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे सोमवार दि. 22 जुलै 2024 रोजी पहाटे 5 वाजता मुंबई येथून मोटारीने दापोलीकडे प्रयाण. सकाळी 11 वा. केंद्र व राज्य पुरस्कृत विविध शासकीय योजनांची आढावा बैठक. (स्थळ : कुलगुरु परिषद दालन, डॉ. बाळासाहेब सावंत कोंकण कृषी विद्यापीठ, दापोली). दुपारी 12 वाजता मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण योजना दापोली, खेड, मंडणगड तालुका शुभारंभ कार्यक्रमास उपस्थिती (स्थळ : सर विश्वेश्वरैय्या सभागृह, डॉ.बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली) दुपारी 2 वाजता दापोली येथून मोटारीने गुहागर, जि. रत्नागिरीकडे प्रयाण. सायंकाळी 4 वाजता मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण योजना गुहागर तालुका शुभारंभ कार्यक्रमास उपस्थिती (स्थळ : श्रीपूजा सेवा मंगल कार्यालय, पाटपन्हाळे (खातू मसाले उद्योग समोर), ता. गुहागर) सायंकाळी 5 वाजता गुहागर येथून मोटारीने चिपळूणकडे प्रयाण. सायंकाळी 6 वाजता रत्नागिरी जिल्हा महिला कबड्डी संघ व प्रशिक्षक यांच्यासमवेत संवाद (स्थळ : शासकीय विश्रामगृह, चिपळूण) सोईनुसार शासकीय विश्रामगृह, चिपळूण येथे राखीव. मध्यरात्री 12.15 वाजता चिपळूण रेल्वे स्थानक येथून कोंकणकन्या एक्सप्रेसने मुंबईकडे प्रयाण.