उद्योग जगतब्रेकिंग न्यूजमहाराष्ट्रराष्ट्रीयरेल्वे अपडेट्स & ट्रॅव्हल
Konkan Railway | रत्नागिरी, खेडमधून रेल्वेद्वारे कंटेनर वाहतूक वाढीबाबत मुंबईत महत्त्वपूर्ण बैठक
![](https://ratnagirilive.in/wp-content/uploads/2024/07/IMG-20240723-WA0026-780x470.jpg)
बेलापूर : कोकण रेल्वेच्या मार्गावर खेड आणि रत्नागिरी येथून कंटेनर वाहतूक वाढवण्याच्या दृष्टीने प्रयत्न केले जात आहेत. याचाच एक भाग म्हणून मुंबईत आज कोकण रेल्वेचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक संतोष कुमार झा आणि विविध कंपन्यांचे वरिष्ठ अधिकारी यांच्यात महत्त्वपूर्ण बैठक झाली.
मुंबईतील बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स येथे झालेल्या या बैठकीला CONCOR चे अधिकारी आणि विविध कंपन्यांचे सत्तर हुन आधिक प्रतिनिधी उपस्थित होते. कोकण रेल्वेच्या मार्गावर कोकण रेल्वेकडून या उद्योजकांना काय काय सुविधा उपलब्ध करून देण्यात येतील, व्यावसायिक फायदे कसे होतील, याची माहिती व्यवस्थापकीय संचालक संतोष कुमार झा यांनी दिली.
यावेळी कोकण रेल्वेचे अनेक वरिष्ठ अधिकारी देखील उपस्थित होते.