कोकण रेल्वेमार्गे उद्या मुंबई-कन्याकुमारी सुपरफास्ट स्पेशल गाडी धावणार!
चिपळूण रत्नागिरीसह कणकवली, सिंधुदुर्ग थांबे
रत्नागिरी : मुंबईतील सीएसएमटी ते कन्याकुमारी अशी कोकण रेल्वे मार्गे धावणारी सुपरफास्ट एक्सप्रेस विशेष गाडी 22 डिसेंबर रोजी धावणार आहे.
या संदर्भात कोकण रेल्वे कडून प्राप्त माहितीनुसार मुंबई सीएसएमटी ते कन्याकुमारी सुपरफास्ट एक्सप्रेस (01461) दिनांक 22 डिसेंबर रोजी दुपारी ३.३० वाजता सी एस एम टी येथून सुटेल आणि दुसऱ्या दिवशी रात्री अकरा वाजून वीस मिनिटांनी ती कन्याकुमारीला पोहोचेल. परतीच्या प्रवासात ही गाडी (01462) कन्याकुमारी येथून दिनांक 24 डिसेंबर 2022 रोजी मुंबईसाठी सुटेल. ही गाडी कन्याकुमारी हुन दुपारी सव्वा दोन वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी रात्री अकरा वाजता ती मुंबईतील सीएसएमटीला पोहोचेल.
कोकण रेल्वे मार्गे धावणारी ही सुपरफास्ट स्पेशल गाडी दादर, ठाणे, पनवेल, रोहा, चिपळूण, रत्नागिरी, कणकवली, सिंधुदुर्ग, सावंतवाडी, मडगाव, कारवार, उडपी हे थांबे घेत एरनाकुलम मार्गे कन्याकुमारीला जाणार आहे. ही गाडी 20 डब्यांची गाडी धावणार आहे