कुटरे येथे बचतगटातील महिलांसाठी फळांपासून जाम बनवण्याचे प्रात्यक्षिक
कुटररे (चिपळूण ): चिपळूण तालुक्यातील खरवते येथील एस. पी. कृषी महाविद्यालयामार्फत कुटरे येथील बचत गटामधील महिलांना फळांपासून जाम बनवण्याचे प्रात्यक्षिक दाखवण्यात आले.
फलोत्पादनाच्या बाबतीत भारताचा जगात दुसरा क्रमांक लागतो. शेतकऱ्यांनी पारंपरिक भातशेतीवर अवलंबून न राहता फळ शेती आणि फळ प्रक्रियेकडे वळले पाहिजे. ही उत्पादने विकल्यास जास्तीत जास्त नफा मिळू शकतो.
कुटरे येथे महिलांना जाम बनवण्याचे प्रात्यक्षिक दाखवताना खरवते येथील कृषी महाविद्यालयाचे विद्यार्थी.
फळ प्रक्रिया हे महिला सक्षमीकरण आणि रोजगाराचे साधन आहे. शासनाच्या विविध योजनांचा लाभ स्वयंसहाय्यता बचतगटांच्या माध्यमातून घेऊन आपण स्वत:चा उद्योग सुरू करू शकतो, अशी माहिती या प्रात्यक्षिक कार्यक्रमादरम्यान कृषी प्रतिनिधी आदित्य सोडमिसे यांनी दिली. ग्रामीण कृषी कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत महिलांना हे प्रात्यक्षिक दाखवण्यात आले.
यावेळी शेतकऱ्यांनी अननस जाम तयार करण्याचे प्रात्यक्षिक दाखवले. यावेळी संजय राजेशिर्के, सुनील मोळक, यशवंत पेधमकर, स्वरूप होवळे, ज्ञानेश्वर विठमल, आनंदी सारेकर, रिया जौस्ते, सुवर्णा मोळक, सुप्रिया मोळक, संध्या राजेशिर्के, संगीता राजेशिर्के, प्रशिला राजेशिर्के, सुप्रिया मोळक विनीत ओणकर, प्रिजील, सिदिक बद्रउदिन उपस्थित होते.