महाराष्ट्ररत्नागिरी अपडेट्सलोकल न्यूज

Hill station machal | पर्यावरणप्रेमींनी जिल्ह्यातील सर्वात उंच ‘मंचालगिरी’ अनुभवल्या ‘श्रावणसरी!

रत्नागिरी जिल्हा निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळाचा उपक्रम

माचाळ गावाचा ताम्रपटात ‘मंचालगिरी’ असा उल्लेख

चिपळूण : निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळाच्या सदस्यांनी, रत्नागिरी जिल्ह्यातील सर्वात उंचीवरचे ठिकाण असलेल्या माचाळ (मंचालगिरी) गावी श्रावणातील पहिल्या रविवारी ‘श्रावणसरी’ अनुभवल्या. ‘मातीच्या घरांच्या गावात’ या ब्रँडिंगखाली नैसर्गिकदृष्टया पर्यटन समृद्ध होण्याची क्षमता असलेले तीन हजार फूट उंचीवरील आणि किल्ले विशाळगड जवळचे माचाळ गाव रस्त्याने जोडले गेले आहे. आजवर फक्त ट्रेकर्सच्या आवाक्यात असलेले हे गाव ‘थंड हवेचे ठिकाण’ म्हणून विकसित होत आहे. श्रीमुचकुंद ऋषींच्या गुहेच्या नेचर ट्रेक निमित्ताने माचाळचे प्रदूषणमुक्त वातावरण आणि थंड हवामानाची उत्साहवर्धक अनुभूती ‘श्रावणसरी’ उपक्रमाच्या माध्यमातून घेता आल्याची भावना सहभागी पर्यावरणप्रेमींनी व्यक्त केली.

पर्यावरण मंडळाचे वरिष्ठ राज्य कार्याध्यक्ष विलास महाडिक यांच्या नेतृत्वाखाली हा उपक्रम घेण्यात आला. उपक्रमांतर्गत पर्यावरण-पर्यटन क्षेत्राचे अभ्यासक धीरज वाटेकर यांनी माचाळबाबत माहिती दिली. वाटेकर म्हणाले, ‘मातीच्या घरांच्या गावात’ या ब्रँडिंगखाली नैसर्गिकदृष्टया पर्यटन समृद्ध होण्याची क्षमता असलेले, तीन हजार फूट उंचीवरील, किल्ले विशाळगड जवळचे माचाळ दोनेक वर्षांपूर्वी रस्त्याने जोडले गेल्याने ‘थंड हवेचे ठिकाण’ म्हणून विकसित होण्याच्या वाटेवर आहे.

या माचाळचा सर्वात जुना उल्लेख १११३च्या एका ताम्रपटात ‘मंचालगिरी’ असा सापडतो. कोल्हापूरच्या पन्हाळगड येथील शिलाहार नृपती द्वितीय भोज यांचा १११३चा दानपट-ताम्रपट आहे. यात दान दिलेल्या ‘कुतापूर’ गावाच्या सीमा सांगताना सह्याद्रीतूत उगम पावून समुद्राला मिळणाऱ्या नद्यांचा निर्देश आलेला आहे. त्यापैकी पहिली नदी मंचालगिरीतून निघाली होती असा उल्लेख आहे. हा मंचालगिरी म्हणजे रत्नागिरी जिल्ह्यातील माचाळ पर्वत आणि त्यात उगम पावलेली नदी मुचकुंदी होय. दुसरी नदी तिच्या दक्षिणेस मारिचगिरीतून उगम पावली होती. तिला गंगा म्हटले आहे. ही राजापूर जवळची नदी असावी. गेल्यावर्षी राजापूर-लांजा नागरिक संघाने येथे सापड लोककला व पर्यटन महोत्सव घेतला होता. या गावातील पारंपरिक ‘सापड’ लोककला शेतीतील स्वच्छतेशी निगडित आहे. गावातील मातीच्या घरांची रचना, पावसाळ्यातील सळद्यांचा आडोसा, माचाळ वासियांनी जपलेली पिरसा संस्कृती अनुभवण्यासारखे असल्याचे वाटेकर यांनी सांगितले.

श्रावणसरी’ उपक्रमासाठी शिवाजी पाटील, राजाराम पाटील, माचाळचे प्रसिद्ध ‘वैदू’ कृष्णा मांडवकर, शिपोशीचे माजी सरपंच हरेश उर्फ बाळशेठ जाधव, ग्रा. पं. सदस्य मुकुंद बाईंग, कोचरीचे सुभाष नाचरे यांचे विशेष सहकार्य लाभले. शिवाजी पाटील यांनी उपस्थितांना गुहेशी जोडलेल्या कथा सांगितल्या. ‘श्रावणसरी’ उपक्रमात विद्याधर अजगोलकर, मायावती शिपटे, शैलजा लांडे, स्नेहल विचारे, संगीता मोरे-कडव, निलम मोहिते, कल्पना देवरुखकर, नसरीन खडस, वैशाली जाधव, संतोषी देवरुखकर, श्रद्धा कारेकर, दीपांजली आरेकर-जाधव, मोहिनी साने, पल्लवी बोडकर, मधुरा सोहनी, संगिता गावडे, श्रुती सावर्डेकर, शिला ओतारी, रिया साळवी, विजया रेवाळे, रेखा चौरे, स्मिता वीरकर, सुप्रिया कदम, अनघा परचुरे, वृषाली सुर्वे, त्रिशला तलवारे, वैदेही सकपाळ, सीमा कदम, सुनीता महाडीक, अपूर्वा देवरुखकर आदी सहभागी झाले होते.

Deepak

कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button