ब्रेकिंग न्यूजमहाराष्ट्ररत्नागिरी अपडेट्सराष्ट्रीयरेल्वे अपडेट्स & ट्रॅव्हललोकल न्यूजसायन्स & टेक्नॉलॉजी
Konkan Railway | रत्नागिरी रेल्वे स्थानकाचाही ‘लूक’ लवकरच बदलणार!
रत्नागिरी : सावंतवाडी तसेच कणकवली पाठोपाठ लवकरच रत्नागिरी रेल्वे स्थानकाचा ‘लूक’ देखील लवकरच बदललेला दिसणार आहे. सध्या वेगाने काम सुरू असून कोकण रेल्वे मार्गावरील महत्त्वाचे असलेले रत्नागिरी रेल्वे स्टेशन पुढील काही महिन्यांमध्ये मॉडर्न झालेले पाहायला मिळणार आहे.
काही महिन्यांपूर्वीच कोकण रेल्वे मार्गावरील रत्नागिरी, कणकवली तसेच सावंतवाडी या रेल्वेस्थानकांना आधुनिक टच देण्यासाठी काम हाती घेण्यात आले होते. राज्याच्या सार्वजनिक बांधकाम खात्याकडून यासाठी निधी खर्च केला जात आहे. सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते या कामाचा शुभारंभ करण्यात आला होता.
- अलीकडेच सावंतवाडी तसेच कणकवली या स्थानकांची आधुनिकीकरणाची कामे पूर्ण झाल्याने त्यांचा लोकार्पण सोहळा देखील पार पडला आहे. आता रत्नागिरी रेल्वे स्थानकावरही कामाने वेग घेतला आहे
- राज्य शासनाच्या निधीतून होत असलेल्या या विकास कामांमुळे नजीकच्या काही महिन्यात रत्नागिरी रेल्वे स्टेशनचे रुपडे बदललेले बघायला मिळणार आहे.
- रेल्वे स्थानकाच्या दर्शनी भागाचे सुशोभीकरणाचे काम सध्या युद्धपातळीवर सुरू आहे. हे काम पूर्ण झाल्यानंतर सावंतवाडी कणकवली पाठोपाठ रत्नागिरी रेल्वे स्थानकातही मॉडर्न लूक दिलेल्या कामाचा लोकार्पण सोहळा होणार असल्याचे समजते.