ब्रेकिंग न्यूजमहाराष्ट्ररत्नागिरी अपडेट्ससायन्स & टेक्नॉलॉजीसाहित्य-कला-संस्कृती

सागर जाधव याच्या ५ निसर्गचित्रांचा विद्यार्थी मुंबईतील विशेष गॅलरी प्रदर्शनात समावेश

देवरुख दि. २८ : २६ व्या विद्यार्थी विशेष-२०२४, गॅलरी प्रदर्शक वार्षिक विद्यार्थी कला प्रदर्शनामध्ये कनकाडी गावचा सुपुत्र सागर प्रदीप जाधव याच्या ५ निसर्गचित्रांचा समावेश झाला आहे. कनकाडी, ता: संगमेश्वर येथील सामाजिक कार्यकर्ते प्रदीप जाधव यांचा सागर हा सुपुत्र असून, सागर सध्या वसंतदादा पाटील प्रतिष्ठानच्या कॉलेज ऑफ इंजीनियरिंग आणि व्हीज्युअल आर्ट, सायन-मुंबई येथे बॅचलर इन फाईन आर्ट मधील द्वितीय वर्षाचे शिक्षण घेत आहे.

देवरुख शिक्षण प्रसारक मंडळाच्या आठल्ये-सप्रे-पित्रे महाविद्यालयातून सागर याने पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण करताना मुंबई विद्यापीठ सांस्कृतिक संघाचे प्रतिनिधित्व करून अभिनय आणि चित्रकला प्रकारांमध्ये राष्ट्रीय आंतरविद्यापीठ युवा महोत्सवात चमकदार कामगिरी केली होती.

सागर जाधव याने साकारलेल्या पाच निसर्गचित्रांचा कोलाज.

२६व्या विद्यार्थी विशेष-२०२४ प्रदर्शनामध्ये महाराष्ट्रातील ११ कला महाविद्यालयातील ३१ विद्यार्थ्यांच्या ११६ चित्रांचा समावेश असून, यामध्ये सागरची ५ निसर्गचित्रे निवडली गेली आहेत. सागरने या ५ निसर्गचित्रांमध्ये देवरुख परिसरातील ३ चित्रे, तर प्रत्येकी १-१ चित्र ग्रँड रोड, मुंबई आणि पनवेल परिसरामध्ये चितारली आहेत. हे ऑनलाइन प्रदर्शन दि.१६ ऑगस्ट ते ३१ ऑगस्ट, २०२४ या कालावधीतhttps://www.gallerypradarshak.com/2024/08/26th-vidyarthi-vishesh.html या लिंक वर पाहण्यासाठी उपलब्ध आहेत. प्रत्यक्ष चित्रप्रदर्शन पाहण्यासाठी: गॅलरी प्रदर्शन, १०० कल्पना बिल्डिंग, ग्राउंड फ्लोअर, प्लॉट नं.३३८, १२वा रोड, खार-वेस्ट, मुंबई-५२ या ठिकाणी संपर्क साधावा असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

सागर जाधव याच्या ५ चित्रांच्या निवडीबद्दल देवरुख शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष सदानंद भागवत, प्राचार्य डॉ. नरेंद्र तेंडोलकर, उपप्राचार्य डॉ. सरदार पाटील, कलाशिक्षक सुरज मोहिते, विलास रहाटे, प्रा. धनंजय दळवी, तसे देवरुख महाविद्यालयाचे सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.

Team RatnagiriLive

कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button