uran news
उरण दि 26(विठ्ठल ममताबादे ) : श्री स्वामी समर्थ आध्यात्मिक विकास व सेवा केंद्र (दिंडोरी प्रणित) अंतर्गत चाणजे, करंजा व मोरा केंद्र- उरण यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार दिनांक 25/12/2022 रोजी कै. नानासाहेब धर्माधिकारी,नगरपरिषद शाळा, उरण येथे सर्व जाती धर्मीय वधू वर परिचय मेळावा आयोजित करण्यात आला होता.
या कार्यक्रमासाठी रायगड भूषण पुरस्कार प्राप्त विशाल पाटेकर व त्यांच्या सुविद्य पत्नी सायली पाटेकर , सामाजिक कार्यकर्ते गोपाळ पाटील व उरण सामाजिक सांस्कृतिक व शैक्षणिक संस्थेच्या अध्यक्षा कल्याणीताई दुखंडे हे उपस्थित होते. मुंबई विवाह संस्कार प्रतिनिधी वंदना ताई करंदीकर व त्यांची टिम यांनी मोलाचे कार्य केले. नाव नोंदणी करून, वधू आणि वरांचा परिचय करून देण्यात आला . विवाह लवकर होण्यासाठी आध्यात्मिक सेवा देण्यात आल्या. या मेळाव्यात 100 ते 150 फार्म भरुन दोन स्थळांची बोलणी झाली. या मेळाव्याची वैशिष्ट्ये या सर्व सेवा विनामूल्य देण्यात आल्या. या कार्यक्रमासाठी उस्फूर्त प्रतिसाद मिळाला. उरण मध्ये प्रथमच अशा प्रकारे वधू वर परिचय मेळावा झाला . या कार्यक्रमासाठी संजय साळुंके, संगिता साळुंके, प्रविण पाटील, वनिता कोळी, मनिषा साळी व स्वाती पवित्रा ताई कोळी आणि सर्व जबाबदार सेवेकरी यांनी प्रचार प्रसार करण्यासाठी मोलाचे कार्य केले.