पाली येथे दिव्यांगांचा आनंद मेळावा
रत्नागिरी : राष्ट्रीय अपंग विकास महासंघ आणि संजीवन दिव्यांग विकास संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने आनंद मेळावा रविवारी (२५ डिसेंबर २०२२रोजी ) लिंगायत मंगल कार्यालय पाली येथे उत्साहात संपन्न झाला. यावेळी रत्नागिरी महसूलचे अधिकारी मिलिंद देसाई, नायब तहसीलदार श्रीम. माधवी कांबळे, श्री. सागर शिंदे, श्री. परिमल डोर्लेकर, श्री.सुमित कोळंबेकर , श्री. स्वप्नतेज मयेकर, श्री. चौगुले (खानु तलाठी), श्री.शिवलकर आदी व्यासपीठावर उपस्थित होते.
या कार्यक्रमाच्या सुरुवातीला सर्व महापुरुषांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. या आनंद मेळाव्याअंतर्गत दिव्यांगाना पेंशन योजनेचेफॉर्म भरण्यात आले, आधार कार्ड अपडेट, आधार कार्ड kyc मतदान आधार कार्ड लिंक करणे असे विविध प्रश्न दिव्यांगाचे सोडविण्यात आले.
यावेळी संजीवन विकास संस्थेचे अध्यक्ष राकेश कांबळे, उपाध्यक्ष इम्रान साटविलकर, सचिव नंदकुमार कांबळे, तसेच राखी कांबळे, आकाश कांबळे, गणपत ताम्हणकर, प्रकाश कदम, संजय कदम सचिन सावंत, कामना कांबळे, मनोज सावंत, ऋषिकेश परपटे, विजय कदम आदी उपस्थित होते.