महाराष्ट्ररत्नागिरी अपडेट्सलोकल न्यूज

लांजा तालुका ठरतोय वन्यजीवांसाठी सुरक्षित अधिवास

लांजा : लांजा तालुका वनक्षेत्र वन्य जीवांसाठी सुरक्षित अधिवास म्हणुन गेल्या काही वर्षांत गणला जाऊ लागला आहे. मात्र, वन्य जीव संरक्षणासाठी वनविभागाकडून जनजागृती होणे गरजेचे आहे.

लांजा तालुक्यात काही वर्षांत बिबट्यांची संख्यावाढ झाली आहे. दुर्मीळ असे उदमांजर, शेकरु, कोलसुंदे, बिबटे, ब्लॅक पँथर, गवा रेडे या प्राण्यां वावर लांजा तालुक्यात आढळून आला आहे. या बरोबर धनेश, खंड्या, सुगरण या पक्षांचं दर्शन विवीध दुर्मिळ फुलपाखरे या तालुक्यांत दिसत आहेत ही प्राणी प्रेमी ना दिलासा देणारी बाब आहे. लांजा तालुक्यात खोरनिंनको, पालू, हरदखले, कोचरी, तळवडे, कूरूचुंब कंनगवली आदी गावात घनदाट जंगल आणि सुरक्षीत अधिवास अशी लांजा तालुक्यात गावे आहेत. गेल्या काही वर्षांत फासकी लाऊन शिकारीचे प्रमाण कमी झालं आहे जंगल क्षेत्रातील वन्यजीवांचा अधिवास सुरक्षित राहून त्यांचे संरक्षण व संवर्धन व्हावे यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे.

दरवर्षी २ ते ८ ऑक्टोबरदरम्यान वन्यजीव सप्ताह साजरा केल जातो वन्यप्राणी आणि त्यांचा अधिवास सुरक्षित राहावा याकरिता जनजागृती करण्याच्या उद्देशाने दरवर्षी २ ते ८ ऑक्टोबरदरम्यान वन्यजीव सप्ताह साजरा केला जातो वन्यप्राण्यांच्या अधिवासात होणाऱ्या मानवी घुसखोरीमुळे, वेगवेगळ्या प्रकल्पांमुळे वन्यप्राणी त्यांच्या अधिवासातून बाहेर पडत आहेत. त्यामुळे मानव-वन्यजीव संघर्ष वाढला आहे. अधिवासाचा ऱ्हास, अवैध शिकार, विकास प्रकल्प यांमुळे वन्यप्राण्यांच्या अधिवासासह त्यांचे अस्तित्वदेखील धोक्यात आले आहे. वन्यजीव संरक्षण आणि संवर्धनासाठी अनेक कायदे असले तरीही अंमलबजावणीचा अभाव हे त्यातले दुखणे आहे.


जैवविविधतेचा घटक असलेले वन्यप्राणी हे मानवी जीवनाचाही एक अविभाज्य घटक आहेत. या वन्यजीवांच्या निसर्गातील महत्त्वाविषयी, त्यांच्या जनजागृतीविषयी माहिती व्हावी, या सप्ताहाच्या निमित्ताने जनजागृतीसाठी अनेक कार्यक्रम आयोजित केले जातात. तरुण पिढीला याचे महत्त्व कळावे म्हणून शाळा व महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांना यात सामावून घेतले जाते. स्वयंसेवींचा यात सहभाग असतो. मात्र हा सहभाग आता अतिशय कमी झाला आहे. अलीकडच्या काही वर्षांत वन्यजीव सप्ताह साजरा करणे हा एक प्रकारे ‘इव्हेंट’ बनत चालला आहे.

या ‘इव्हेंट’मध्ये वन्यजीवांचे व त्यांच्या अधिवासाचे संरक्षण कितपत केले जाते, हा खरोखरच संशोधनाचा विषय आहे. यापूर्वी समाजातील प्रत्येक घटकाला सोबत घेऊन सप्ताहातील कार्यक्रमाची आखणी केली जात होती. मात्र आता वन विभाग स्वत:च कार्यक्रम ठरवून मोकळे होत आहे. त्यामुळे वन्यजीव सप्ताह ज्या उद्देशाने सुरू करण्यात आला होता, तो मूळ उद्देश आता हरवत चालला आहे.वन्यजीव सप्ताह दरवर्षी एका विशिष्ट संकल्पनेवर आधारित असतो. त्याचा मूळ उद्देश हा सप्ताह त्या संकल्पनेला अनुसरून वन्यजीव सप्ताह साजरा करणे हा असतो. या संकल्पनेनुसार वर्षभर काम करावे लागते आणि पुढच्या सप्ताहात त्याचा लेखाजोखा मांडावा लागतो. प्रत्यक्षात या संकल्पनेचा विसर हा सप्ताह साजरा करताना वन खात्याला पडलेला दिसतो. कधी तरी पहिल्या दिवशी ही संकल्पना राबवली जाते आणि इतर दिवशी दरवर्षीप्रमाणे चर्चासत्र, छायाचित्र स्पर्धा, विद्यार्थी, जंगलफेरी असे ठरावीक कार्यक्रम राबवले जातात. यात इतर विभाग, सामान्य नागरिक यांना सहभागी करून घेतले जात नाही. सामान्य माणसांपर्यंत विभाग पोहोचत नाही.

Deepak

कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button