एसटीच्या पर्यावरणपूरक ई शिवाई बसेस लवकरच रस्त्यावर धावणार !
रत्नागिरी : काळानुसार एसटीच्या गाड्यांनी देखील कात टाकण्यास सुरुवात केली आहे. पूर्वीच्या जुन्या ‘लाल परी’च्या जागी नव्या स्वरूपातील बसेस रस्त्यावर धाऊ लागल्या आहेत. आता शिवाई प्रकारातील बसेस पर्यावरणपूरक इलेक्ट्रिक श्रेणीमध्ये ‘ई शिवाई’ नावाने प्रवाशांच्या सेवेत दाखल होत आहेत.
प्रदूषण विरहित चार्जिंगवर चालणाऱ्या ई शिवाई एसटी बसेस लवकरच प्रवाशांच्या सेवेकरिता दाखल होणार आहेत. या श्रेणीमधील गाड्यांचा ‘फर्स्ट लूक’ राज्य परिवहन महामंडळाने आपल्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर प्रवाशांसाठी खुला केला आहे.
या आधी पूर्वीच्या लाल परीला जवळचा वाटेल अशा रंगसंगतीमध्ये अलीकडेच एसटीने अधिक आरामदायी ग्राहक गाड्यांची श्रेणी प्रवाशांसाठी सेवेत आणली आहे. आता पर्यावरणपूरक ई शिवाई बसेस देखील लवकरच रस्त्यावर धावणार आहेत. हिरव्या रंगसंगतीमध्ये या गाड्या प्रवाशांच्या सेवेत दाखल होणार आहेत.