कोकण मराठी साहित्य परिषदेच्या निबंध स्पर्धेत ७० स्पर्धकांचा सहभाग
दापोली : कोकण मराठी साहित्य परिषद शाखा दापोली व रामराजे महाविद्यालय दापोली यांचे संयुक्त विद्यमाने वाचन प्रेरणा दिन व ज्येष्ठ साहित्यिक जयवंत दळवी यांच्या जन्मशताब्दी वर्षा निमित्ताने घेण्यात आलेल्या तालुकास्तरीय निबंध स्पर्धेला उस्फूर्त प्रतिसाद मिळाला.
या स्पर्धेत ७० स्पर्धकांनी सहभाग घेतला. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान श्री रामराजे वरिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अशोक निर्बाण यांनी भूषविले. कार्यक्रमाच्या सुरुवातीस भारताचे माजी राष्ट्रपती डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेचे मान्यवरांच्या हस्ते पूजन करण्यात आले. यावेळी घेण्यात आलेल्या निबंध स्पर्धेत यशस्वी विद्यार्थ्यांना गट१-(५वीते७वी) विषय: मला आवडलेले पुस्तक यामध्ये प्रथम क्रमांक विनीत विनय राणे जि.प. शाळा विरसई रोख रक्कम ५००रू. सन्मानचिन्ह प्रशस्तीपत्र, द्वितीय क्रमांक नीरजा मनोज वेदक जि.प.शाळा चंद्रनगर रोख रक्कम ३००रू. सन्मानचिन्ह, प्रशस्तीपत्र, तृतीय क्रमांक वेदिका जितेंद्र चव्हाण पूज्य साने गुरुजी विद्यामंदिर पालगड रोख रक्कम २०० रु. सन्मानचिन्ह प्रशस्तीपत्र, गट २( आठवी ते दहावी) विषय: वाचन प्रेरणा काळाची गरज यामध्ये प्रथम क्रमांक पूर्वा सचिन जगदाळे ए.जी. हायस्कूल दापोली रोख रक्कम ७००रु.सन्मानचिन्ह, प्रशस्तीपत्र,द्वितीय क्रमांक जान्हवी संदीप जामकर पूज्य साने गुरुजी विद्यामंदिर पालगड रोख रक्कम ५००रू. सन्मानचिन्ह, प्रशस्तीपत्र, तृतीय क्रमांक श्रीया संदीप दाभोळे रोख रक्कम ३००रु. सन्मानचिन्ह, प्रशस्तीपत्र तर गट क्रमांक ३(अकरावी ते पंधरावी) विषय: मला भावलेले लेखक जयवंत दळवी यामध्ये प्रथम क्रमांक ऋतुजा मंगेश माने श्री रामराजे ज्युनिअर कॉलेज दापोली रोख रक्कम १०००, रु.सन्मान चिन्ह, प्रशस्तीपत्र द्वितीय क्रमांक पुर्वा प्रदीप रोकडे रोख रक्कम ७०० रु. सन्मानचिन्ह प्रशस्तीपत्र, तृतीय क्रमांक पुजा संतोष नाचरे ए.जी.हायस्कूल दापोली रोख रक्कम ५००रु. सन्मानचिन्ह, प्रशस्तीपत्र देऊन मान्यवरांचे हस्ते गौरविण्यात आले. स्पर्धेचे परीक्षण साहित्यप्रेमी व गझलकार सुदेश मालवणकर यांनी केले.
यावेळी कोकण मराठी साहित्य परिषदेचे उपाध्यक्ष सुनील कदम यांनी काव्यवाचन करून पुस्तकांचे महत्त्व विद्यार्थ्यांना सांगितले. तर श्री रामराजे कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्राचार्या वेदिका राणे यांनी आज पुस्तक वाचनसंस्कृती कशी कमी होत चालली आहे हे स्पष्ट करून विद्यार्थ्यांच्या जीवनात वाचनाचे महत्त्व का आहे हे सांगितले. परीक्षक सुदेश मालवणकर यांनी निबंध लिहिताना लक्षात घ्यावयाच्या बाबींबद्दल मार्गदर्शन केले. तसेच कोमसापचे जनसंपर्क प्रमुख व लेखक बाबू घाडीगावकर यांनी ज्येष्ठ साहित्यिक जयवंत दळवी यांच्या साहित्याची माहिती देऊन कोमसापचे साहित्य निर्मितीतील योगदान स्पष्ट केले. आपल्या अध्यक्षीय मनोगतामध्ये डॉ.अशोक निर्बाण यांनी वाचन वृद्धिंगत कसे करावे याबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाप्रसंगी कोकण मराठी साहित्य परिषदेचे उपाध्यक्ष कुणाल मंडलिक, सहसचिव अरविंद मांडवकर, सदस्य राजेश पवार तसेच कोमसापचे पदाधिकारी, श्री रामराजे महाविद्यालयाचे शिक्षकवृंद, सहभागी स्पर्धक,पालक वर्ग, विद्यार्थी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक कोमसाप दापोली शाखेचे अध्यक्ष चेतन राणे यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. जीवन गुहागरकर यांनी केले. तर आभार प्रा. स्मिता बैकर यांनी मानले.