मविआचा मुख्यमंत्रीपदाचा चेहरा रोज बदलतो : चंद्रशेखर बावनकुळे
सुधीर पारवे यांना विजयी करण्याचे आवाहन
मुंबई : भाजपा महायुती विधानसभा निवडणूक विकासासाठी लढत आहे तर, दुसरीकडे महाविकास आघाडीमधील नेते मुख्यमंत्री होण्यासाठी निवडणूक लढत आहेत. महाविकास आघाडीतील मुख्यमंत्री पदाचा चेहरा रोज बदलत असल्याची टीका भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष श्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली. महाराष्ट्राच्या भल्यासाठी महायुतीचा एक-एक उमेदवार विधानसभेत पोहचवावा, असे आवाहन त्यांनी केले.
महायुतीचे भारतीय जनता पक्षाचे उमेदवार सुधीर पारवे यांच्या प्रचारार्थ श्री बावनकुळे यांनी शनिवारी (दि.9) उमरेड तालुक्यातील बेला, सिर्सी, नांद व कुही येथे सभा घेतल्या. बेला येथे काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला. चंद्रशेखर बावनकुळे यांनी सर्वांचे स्वागत करत प्रवेश स्वीकार केला. विधानसभा निवडणूक महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या, लाडक्या बहिणींच्या, युवकांच्या नशिबाची असल्याचे सांगून श्री बावनकुळे म्हणाले, चुकून काँग्रेस आघाडीचे सरकार आले तर महायुती सरकारने सुरू केलेल्या लाडकी बहीण, शेतकऱ्यांना मोफत वीजपुरवठा यासह इतर कल्याणकारी योजना बंद होतील. महाराष्ट्राच्या विकासाला पुन्हा खीळ बसेल.
उमरेड विधानसभा क्षेत्रात तब्बल 78 हजार महिला भगिनींना लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी त्यांनी अथक प्रयत्न केले असल्यानेच त्यांच्या कार्याची दखल घेत भारतीय जनता पक्षाने त्यांना चौथ्यांदा निवडणूक लढवण्याची संधी दिली आहे.
यावेळी भाजपाचे उमेदवार सुधीर पारवे, माजी आमदार राजु पारवे, आनंदराव राऊत, जयकुमार वर्मा, डॉ. मेश्राम,पद्माकर कडु, रुपचंद कडू, महेश दिवसे, पुष्पा वाघाडे, रजनी लोणारे, मिनाक्षी कावटे, सुभाष राऊत, गोविंदा ईटनकर, वंदना गेडाम, शालूमेढुले, किर्ती सुरणकर, राजकुमार राऊत, मनोज दांदडे, अतुल नारनवरे, राजु नेवारे, यशवंत लामपुसे, हनुंजी शिंदे, विजय आंभोर, संजय ढोके, मिथुन माटे, प्रमोद बावनगडे, अनिकेत वराडे, भास्कर येंगळे,श्रावण वराडे, अरविंद चौधरी, स्वप्नील गिल्लूरकर, मनोहर कावटे, राजकुमार राऊत, शंकर आंबटकर, अभिनव गोळघाटे, राजू नेवारे राजेंद्र चीपडा, भूषण घुमडे, पंकज रोडे, दिलीप कोल्हे, सुनील गावंडे, जयकुमार भोधाने, मनिष बारपत्रे, यशवंत लामपुसे यांच्या सह भाजपा प्रमूख पदाधिकारी व नागरिकांची प्रचंड मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
राहुल गांधींकडून संविधानाचा अपमान
महाविकास आघाडीमध्ये तब्बल आठजण मुख्यमंत्रीपदाचे दावेदार असून त्यासाठीच भांडणं सुरू आहे. काँग्रेसमध्ये एकाहून एक विचित्र लोक असून राहुल गांधी यांनी नागपुरात त्यांच्या सभेत संविधानाचे मुख्यपृष्ठ वापरून छापलेली कोरी पुस्तिका वाटून संविधानाचा अपमान केला आहे.