कसबा येथे काळभैरव जयंतीनिमित्त उद्यापासून विविध कार्यक्रम
संगमेश्वर दि. २१ : “दक्षिण काशी” म्हणून प्रसिध्द असलेल्या कसबा संगमेश्वर येथील श्री देव काळभैरव जोगेश्वरी (भैरीभवानी) मंदिरामध्ये श्रींचा प्रगटदिन सोहळा कार्तिक वद्य अष्टमी शके १९४६ शनिवार दि. २३ नोव्हेंबर २०२४ रोजी संपन्न होणार आहे. सर्व भक्त मंडळींनी श्री दर्शनाचा लाभ घ्यावा असे आवाहन मंदिर विश्वस्त समितीने केले आहे.
श्री काळभैरव प्रकटदिन सोहळ्या निमित्त आयोजित कार्यक्रम पुढील प्रमाणे शुक्रवार दि. २२ नोव्हेंबर २०२४ रात्रौ ९.३० वा. प्रवचन- ह. भ.प. श्री. श्रीनिवास पेंडसे शनिवार दि. २३ नोव्हेंबर २०२४ सकाळी ७.०० वा.रुद्राभिषेक, सकाळी १०.३० वा. प्रकटदिन किर्तन – ह.भ.प. श्रीनिवास पेंडसे साथसंगत – तबला किरण लिंगायत संवादिनी आनंद लिंगायत, दु. १२.३० वा. आरती व मंत्रपुष्पांजली, दु. १ ते ३ वा. महाप्रसाद, दुपारी ३ ते ५ महिलांचे भजन, रात्री ७.३० ते ८ वा.आरती व मंत्रपुष्पांजली,रात्री ८.३० ते १०.३० वा. : संगीत भजन सर्व भक्त मंडळींनी श्री दर्शनाचा लाभ घ्यावा असे आवाहन श्री देव काळभैरव जोगेश्वरी (भैरीभवानी) मंदिर कसबा संगमेश्वर विश्वस्त मंडळाने केले आहे.