राष्ट्रीय तायक्वांदो स्पर्धेच्या प्रशिक्षकपदी शशिरेखा कररा यांची निवड
रत्नागिरी : तायक्वांदो फेडरेशन ऑफ इंडियाच्या वतीने व हरियाणा तायक्वांदो असोसिएशन आयोजित 38 वी राष्ट्रीय सब ज्युनिअर तायक्वांदो स्पर्धा 2024 ताऊ देवीलाल स्टेडियम पंचकुला हरियाणा येथे २९ नोव्हेंबर ते १ डिसेंबर २०२४ या कालावधीत होत आहेत. या राष्ट्रीय तायक्वांदो स्पर्धेकरिता रत्नागिरी जिल्ह्यातून सौ. शशिरेखा राम कररा यांची महाराष्ट्र संघाच्या महिला संघ प्रशिक्षिकापदी निवड झाली आहे.
तायक्वांदो असोसिएशन ऑफ महाराष्ट्र अध्यक्ष डॉ. अविनाश बारगजे महासचिव मिलिंदजी पठारे (शिवछत्रपती पुरस्कार विजेते) कोषाध्यक्ष व्यंकटेश्वरराव कररा (जिल्हा क्रीडा संघटक पुरस्कार विजेते) श्री. प्रवीण बोरसे (शिवछत्रपती पुरस्कार विजेते) रत्नागिरी तायक्वांडो स्पोर्ट्स असोसिएशनचे उपाध्यक्ष शैलेश गायकवाड (PI) विश्वदास लोखंडे (राष्ट्रीय खेळाडू प्रशिक्षक) सचिव लक्ष्मण कररा ( जिल्हाप्रमुख प्रशिक्षक) खजिनदार शशांक घडशी (जिल्हा संघटक क्रीडा पुरस्कार विजेते) यांनी शुभेच्छा देऊन अभिनंदन केले.