राज्यसभेच्या ६ जागांसाठी होणार २० डिसेंबरला निवडणूक

२० डिसेंबर रोजी मतदान आणि निकालही
नवी दिल्ली : राष्ट्रीय निवडणूक आयोगाने राज्यसभेच्या ६ रिक्त जागांवरील निवडणुकीसाठी मंगळवारी अधिसूचना जारी केली आहे २० डिसेंबर रोजी राज्यसभेच्या ६ जागांकरिता मतदान होणार आहे. आंध्रप्रदेशच्या तीन ओडिशा, हरियाणा आणि पश्चिम बंगालमधील प्रत्येकी एका जागेसाठी ही निवडणूक होणार आहे.
उमेदवारी अर्ज भरण्याची अंतिम मुदत १० डिसेंबर तर ११ डिसेंबर रोजी उमेदवारी अर्जाची छाननी होणार आहे १३ डिसेंबरपर्यंत अर्ज मागे घेता येणार आहेत २० डिसेंबर रोजी सकाळी ९ ते दुपारी ४ वाजेपर्यंत मतदान होणार असून त्याच दिवशी संध्याकाळी ५ वाजल्यापासून मतमोजणी सुरू होईल.
हरियाणा आणि महाराष्ट्राच्या विधानसभा पराभवानंतर निवडणुकीतील राज्यसभा निवडणुकीतदेखील विरोधी पक्षांची मोठी कसोटी लागणार आहे महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला दारुण पराभव पत्करावा लागला आहे.
ऑगस्ट महिन्यात वायएसआर काँग्रेसचे नेते वेंकटरमण राव, मोपीदेवी बीषा मस्तान राय बादव आणि रयागा कृष्णैया यांनी राज्यसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता तर सुजीत कुमार बांच्या राजीनाम्यानंतर ओडिशात राज्यसभेची एक जागा रिक्त होती.
ऑगस्ट महिन्यात कोलकात्यातील आरजीकर वैद्यकीय महाविद्यालय तसेच रुग्णालयात एका महिला डक्टरची बलात्कारानंतर हत्या करण्यात आली होती या घटनेच्या पार्श्वभूमीवर तृणमूल नेते जवाहर सरकार यानी राज्यसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता.
हरियाणा विधानसमा निवडणुकीत भाजप नेते कृष्णलाल पवार यांनी विजय मिळविल्यावर राज्यसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता आता हरियाणाच्या या जागेकरिता पोटनिवडणूक होणार आहे.