खेडच्या प्रा. सतिश साठे यांना दिल्लीत डायनामिक टिचर पुरस्कार प्रदान
खेड : रत्नागिरी जिल्ह्यातील खेडमधील श्रीमान चंदूलाल शेठ हायस्कूल व ज्युनिअर माविद्यालयामधील शिक्षक सतिश साठे याना शुक्रवारी (दि.30 डिसेंबरला) दिल्लीतील गुरगाव येथे इंटरनेशनल एज्युकेशन एवार्डस पुरस्कार कार्यक्रमात डायनामिक टिचर ऑफ़ द इयर 2022 हा पुरस्कार स्विटझरलँडच्या लेडी लाझर वुकाडीनोवीक यांच्या हस्ते सन्मानपूर्वक देण्यात आला.
प्रा. सतिश साठे गेली २५ वर्षे शैक्षणिक क्षेत्रात विद्यार्थ्यांसाठी उत्तम काम करत आहेत. त्यानी विद्यार्थी हा केंद्र बिंदू मानुन त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी वेगळे काय करता येइल, या करिता विविध उपक्रम राबविण्यात मोठे योगदान दिले आहे. याची दखल घेउन हा पुरस्कार त्याना देण्यात आला आहे. प्रा.साठे याना हा आंतरराष्ट्रीय पातळीवरील पुरस्कार मिळाल्याबद्दल शिक्षण क्षेत्रातून त्यांचे अभिनंदन आणि कौतुक होत आहे.