उद्योग जगतमहाराष्ट्ररत्नागिरी अपडेट्सलोकल न्यूज

रत्नागिरी जिल्ह्यात १४८ महा-ई सेवा केंद्रांसाठी १७ डिसेंबरपर्यंत अर्ज मागवले

रत्नागिरी : जिल्ह्यातील रिक्त झालेल्या 148 महा-ई सेवा केंद्रांसाठी स्थापन करण्यासाठी इच्छुक व्यक्तीने विहित नमुन्यातील अर्ज माहिती तंत्रज्ञान विभाग, जिल्हाधिकारी कार्यालयात सादर करावा. अर्ज स्वीकारण्याचा कालावधी दि. 9 डिसेंबर ते 17 डिसेंबर 2024 सायंकाळी 5 वाजेपर्यंत (शासकीय सुट्टीचे दिवस वगळून) कार्यालयीन वेळेत समक्ष सादर करावेत अथवा ditratnagiri@gmail.com यावरही अर्ज स्वीकारण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे, असे उपजिल्हाधिकारी (सा.प्र.) शुभांगी साठे यांनी कळविले आहे.

अर्जासोबत सादर करावयाचे कागदपत्रे
आधार कार्ड, पॅन कार्ड, संगणकीय प्रमाणपत्र (MSCIT/Equivalent), शैक्षणिक अर्हता 12 किंवा समकक्ष व त्यापुढील , CSC धारक असल्यास त्यासंबंधित प्रमाणपत्र, अनुभव प्रमाणपत्र (असल्यास)
महा ई सेवा केंद्रे चालवण्याबाबत सर्वसाधारण अटी व शर्ती खालील प्रमाणे-
केंद्र मंजूर ठिकाणीच चालविण्यात यावे अन्यथा इतर ठिकाणी आढळून आल्यास त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल. शासनाने ठरवून दिलेल्या वेळापत्रकानुसार महा ई- सेवा केंद्र चालू ठेवून नागरिकांना सेवा पुरविणे. शासनाने ठरवून दिलेल्या ब्रॅडिंग चा वापर करणे तसेच महाराष्ट्र माहीती तंत्रज्ञान महामंडळाने स्थापन केलेल्या हेल्पलाईन क्रमांकाचा तपशील आपले सरकार सेवा केंद्राच्या दर्शनी भागावर प्रसिद्ध करणे तसेच ठरवून दिलेल्या दरापेक्षा अधिक शुल्काची आकरणी न करणे. दरपत्रके दर्शनी भागावर प्रसिध्द करणे. जर ग्रामपंचायत क्षेत्रात महा ई सेवा केंद्राची संख्या कमी असल्यास त्या ग्रामपंचायत क्षेत्रात किंवा नागरी क्षेत्रात/वार्ड भागात CSC-SPV कडे ऑनलाईन नोंदणीकृत CSC केंद्रे (नागरिकांना B2C सेवा प्रदान करत
असलेली) महा ई सेवा केंद्राचा दर्जा प्राप्त करण्यासाठी जिल्हाधिकारी यांच्याकडे अर्ज करू शकतात.

सर्व ग्राहकांना सौजन्याची वागणूक देणे आणि आवश्यक मदत व सहकार्य करणे. विविध शासकीय योजनांच्या अंमलबजावणीत ठरवून दिलेले वेळापत्रक व निर्देश काटेकोरपणे पाळणे. महा ई सेवा केंद्रासाठी अर्ज करणारा नागरिक हा त्या गावातील रहिवासी असावा. जर त्या गावातील नागरिकांचा अर्ज आला नसेल तर, जवळच्या गावातील रहिवासी असलेल्या अर्जाचा विचार करण्यात येईल. अर्ज सादर करताना अर्जदाराने सर्व आवश्यक कागदपत्राच्या छायांकित प्रती अर्जासोबत सादर करणे बंधनकारक राहील, त्यानंतर अर्जदाराकडून कोणतीही कागदपत्रे स्वीकारली जाणार नाहीत. एका कुटुंबातील फक्त एकच व्यक्ती महा ई सेवा केंद्रसाठी अर्ज करु शकतो. त्याच्या कुटुंबातील दुसरा अर्ज प्राप्त झाल्यास तो ग्राहय धरला जाणार नाही. अर्जामध्ये माहिती चुकीची आढळल्यास अर्ज रद्द करून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. आपले महा ई सेवा केंद्रांना शासनाने तसेच जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत वेळेावेळी देण्यात येणाऱ्या निर्देशांचे पालन करावे लागेल. तसेच उपविभागीय अधिकारी व तहसीलदार यांनी वेळोवेळी दिलेल्या आदेशाचे पालन करावे लागेल.

प्रस्तावित आपले महा ई सेवा केंद्राच्या गावामध्ये केंद्र देण्याबाबतचे किंवा केंद्र रद्द करण्याबाबतचे सर्व अधिकार जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष, जिल्हा सेतू समिती यांनी राखून ठेवले आहेत. जाहिरातीत दर्शवलेल्या आपले महा ई सेवा केंद्रांमध्ये भविष्यात बदल होण्याची शक्यता आहे. एका उमेदवाराने फक्त कोणत्याही एकाच आपले सरकार सेवा केंद्रासाठी अर्ज करणे आवश्यक आहे. एका केंद्राला एकापेक्षा जास्त अर्ज प्राप्त झाल्यास योग्य पर्यायाच्या आधारे उमेदवाराची निवड करणे याबाबतचे सर्व अधिकार जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष, जिल्हा सेतू समिती यांनी राखून ठेवले आहेत. याबाबत जिल्हाधिकारी यांनी घेतलेला निर्णय अंतिम राहील. याबाबत भविष्यात कोणत्याही प्रकारचा दावा सांगता येणार नाही.

वरील जाहिराती काही अडचणी असल्यास आवश्यक माहितीसाठी 8828003028 या भ्रमणध्वनी क्रमांकावरती संपर्क साधावा. ही जाहिरात www.ratnagiri.nic.in या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे. पात्र/अपात्र उमेदवारांची यादी www.ratnagiri.nic.in या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात येईल.

Team RatnagiriLive

कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button