Konkan Railway | मुंबई -करमळी हिवाळी स्पेशल गाडी २३ डिसेंबरपासून धावणार

मुंबई : मध्य रेल्वे नाताळ आणि हिवाळी सुट्यांमध्ये प्रवास करणाऱ्या प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन मुंबई – करमळी दरम्यान अतिरिक्त १८ हिवाळी विशेष गाड्या चालवण्याची घोषणा रेल्वेने केली आहे.
कोकण रेल्वे मार्गावर धावणाऱ्या या विशेष गाड्यांचा तपशील खालीलप्रमाणे आहेतः
लोकमान्य टिळक टर्मिनस – करमाळी – लोकमान्य टिळक टर्मिनस दैंनदिन विशेष – १८ सेवा
01149 विशेष दि. २३.१२.२०२४ ते दि. ३१.१२.२०२४ पर्यंत लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई येथून दररोज १५.३० वाजता सुटेल आणि करमळी येथे दुसऱ्या दिवशी ०५.३० वाजता पोहोचेल. (९ फेऱ्या)
01150 विशेष दि. २४.१२.२०२४ ते दि. ०१.०१.२०२५ पर्यंत करमळी येथून दररोज ०६.४५ वाजता सुटेल आणि लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई येथे त्याच दिवशी २२.१५ वाजता पोहोचेल. (९ फेऱ्या)
विशेष गाडीचे थांबे
ठाणे, पनवेल, पेण, रोहा, माणगाव, खेड, चिपळूण, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, राजापूर रोड, वैभववाडी रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी रोड आणि थिवि.
संरचना : एक प्रथमसह- द्वितीय वातानुकूलित, तीन द्वितीय वातानुकूलित, १२ तृतीय वातानुकूलित, २ शयनयान, २ सामान्य द्वितीय श्रेणी/चेअर कार, १ लगेज कम गार्ड्स ब्रेक व्हॅन आणि १ जनरेटर व्हॅन.
आरक्षण : विशेष ट्रेन क्र.01149/01150 साठी विशेष शुल्कासह बुकिंग दि. २१.१२.२०२४ रोजी सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रांवर आणि www.irctc.co.in या संकेस्थळावर सुरू होईल.